Travel : जरा तुम्हाला अनोख्या , ठिकाणी भटकंती करायला आवडत असेल. वेगळ्या वाटा धुंडाळायचा मोह होत असेल तर आजचा हा लेख खास तुमच्यासाठी आहे. अनोख्या आणि विशिष्ठ ठिकाणांना भाटी देण्यासाठी ट्रॅव्हल लव्हर्स परदेशात जातात, भरपूर पैसे खर्च करून विविध ठिकाणांना भेटी देतात. मात्र तुम्हाला आज आम्ही भारतातल्याच अशा अद्भुत ठिकाणाविषयी सांगणार आहोत जिथे गेल्यावर तुम्हाला समाधान वाटल्याशिवाय राहणार नाही. शिवाय तुम्हाला आश्चर्य देखील वाटल्याशिवाय राहणार नाही. चला तर मग जाणून घेऊया…
होय, आम्ही अशाच एका चुंबकीय जागेबद्दल बोलत आहोत, ज्याला जर तुम्ही चमत्कारिक ठिकाण (Travel) म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. सोप्या भाषेत सांगायचे तर, पृथ्वीच्या भूचुंबकीय उर्जेमध्ये चुंबकीय चार्ज केलेले कण आकर्षित करण्याची क्षमता आहे. आणि भारतातील अशी ठिकाणे पाहण्यायोग्य ठिकाणांमध्ये सर्वात वर येतात.
मॅग्नाटिक हिल लडाख (Travel)
लडाखमधील लेह-कारगिल-बटालिक महामार्गावर स्थित प्रसिद्ध मॅग्नेटिक हिल हे भारतातील (Travel) अद्वितीय ठिकाणांपैकी एक आहे. येथील चुंबकीय आकर्षण इतके मजबूत आहे की जड वाहने कोणत्याही प्रतिकाराशिवाय वर खेचली जातात. इतकंच नाही तर इथे कोणताही द्रव पदार्थ ओतला की तो खाली न जाता वरच्या दिशेने जातो. म्हणजे गंमतीत बोलायचे झाल्यास तर इथे वाहनांमध्ये तेल भरण्याची गरज भासणार नाही, कारण इथे वाहने आपोआप धावत असतात. विशेष म्हणजे याला ऑप्टिकल इल्युजन म्हणतात. तरीही जो कोणी लडाखला येतो तो लेहजवळील ही मॅग्नेटिक हिल पाहायला नक्कीच जातो. ही टेकडी जादूपेक्षा कमी नाही.
अमरेलीतील तुलसीश्याम रोड (Travel)
तुळशीश्याम हे एक पौराणिक स्थान मानले जाते, जेथे भगवान श्रीकृष्णाने तुल नावाच्या राक्षसाचा वध केला होता. म्हणून या ठिकाणाला गुजरातमध्ये तुलसीश्याम असे नाव पडले. 3000 वर्ष जुन्या तुळशीश्याम मंदिराव्यतिरिक्त येथील रस्ता ग्रॅविटी हिलसाठी प्रसिद्ध आहे. इथेही अनेक पर्यटक आपली वाहने थांबवून लडाखसारखा अनुभव घेतात. त्यामुळे हे ठिकाण भारतात आढळणाऱ्या चुंबकीय पर्वतांपैकी एक आहे.