Travel : सध्याची लाइफस्टाइल ही अत्यंत धकाधकीची आहे. घर, जॉब, फ्युचर अशा बऱ्याच गोष्टींचा स्ट्रेस असतोच. जर तुम्हाला ह्या सर्व स्ट्रेस पासून सुटका करुन घ्यायची असेल एखाद्या शांत ठिकाणी जाऊन तुम्हाला स्ट्रेसफ्री व्हायचे असेल तर आजचा लेख तुमच्यासाठी महत्वपूर्ण आहे म्हणून समजा. आज आम्ही तुम्हाला भारतातल्या अशा एका ठिकणाबद्दल (Travel) सांगणार आहोत इथे तुम्ही मेंटली डिटॉक्स व्हाल. इथली शांतता तुम्हाला मन:शांती देऊन जाईल. चला तर मग जाणून घेऊया या ठिकाणाबद्दल…
खरंतर शांतीचे प्रसारक म्हणून गौतम बुद्ध जगभरात प्रसिद्ध आहेत. जेथील वृक्षाखाली गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली ते ठिकाण म्हणजे बोधगया . याच ठिकणी बोधी वृक्षाखाली बसून त्यांना ज्ञानाची प्राप्ती झाली. त्यानंतर त्यांच्या ज्ञानाने संपूर्ण जग आनंदित होऊ लागले. तेव्हापासून जगभरातील लोक या ठिकाणी भेट देण्यासाठी येत असतात. हे एक तीर्थस्थान बनले आहे. जगभरातून अनेक लोक या ठिकाणी भेट देण्यासाठी (Travel) येत असतात. चला जाणून घेऊया इथली काही प्रेक्षणीय स्थळांबाबत
महाबोधी मंदिर (Travel)
गया येथील सर्वात प्रसिद्ध पर्यटन स्थळ म्हणजे महाबोधी मंदिर. या मंदिरात जगभरातून बौद्ध अनुयायी येतात. हे ठिकाण देखील विशेष आहे कारण येथे बुद्धांना ज्ञान प्राप्त झाले होते. या मंदिराचा परिसर अतिशय शांत आहे. युनेस्कोने याला जागतिक वारसा घोषित केले आहे.
द ग्रेट स्टॅच्यू ऑफ बुद्ध
गया शहर पूर्णपणे गौतम बुद्धांना समर्पित आहे. द ग्रेट स्टॅच्यू ऑफ बुद्ध हे एक असे ठिकाण (Travel) आहे जिथे बुद्धांची ध्यानस्थ मूर्ती स्थापित केली आहे. या 25 मीटर उंच मूर्तीवर गौतम बुद्ध कमळावर बसलेले दिसतात. हा पुतळा बनवण्यासाठी 7 वर्षे लागली.
रॉयल भूतानी मठ (Travel)
अतिशय शांत वातावरणात, रॉयल भूतानी मठ हे बौद्ध धर्म जाणून घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी एक आदर्श ठिकाण ठरेल. या मठात (Travel) बौद्ध धर्माचे शिक्षण दिले जाते जेथे भगवान बुद्धाची मूर्ती स्थापित केली जाते.
थाई मठ
हा मठ खास आहे कारण तो थायलंडच्या राजाने बांधला होता. या मठात तुम्हाला (Travel) थाई कलेचे नमुने पाहायला मिळतील. थाई मठ हा भारतातील एकमेव थाई मठ असल्याचे मानले जाते.
दूंगेश्वरी गुफा मंदिर
दूंगेश्वरी मातेच्या मंदिराला सर्व धर्माच्या लोकांसाठी अनन्यसाधारण (Travel) महत्त्व आहे. या गुहेत राहून महात्मा बुद्धांनी वर्षानुवर्षे ध्यान केले, असे बौद्ध अनुयायी मानतात.