Travel : पावसाळा आला की निसर्ग आपले रूप बदलू लागतो. निसर्गाचं ही बदलेलं रुपडं पाहण्यासारखं असतं . धरणीने पांघरलेली हिरवी शाल. हिरव्या गर्द डोंगर रांगा आणि त्यामधून दुधासारखे कोसळणारे धबधबे… आहाहा ! निसर्गाचे हे सुंदर रूप पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने गर्दी करत असतात. मुंबई मध्ये राहणाऱ्या मुंबईकरांसाठी आपल्या धकाधकीच्या जीवनातून निवांत क्षण घालवण्यासाठी मान्सून म्हणजे परफेक्ट सिझन… म्हणूनच तुम्ही पण मुंबईच्या आसपास पावसाळी पर्यटन स्थळांचा विचार करीत असाल तर आम्ही आज तुम्हाला मुंबईपासून जवळ असणारी टॉप ५ पर्यटन स्थळांबद्दल सांगणार (Travel ) आहोत. चला तर मग जाणून घेऊया …
कान्हेरी (Travel )
मुंबई शहराच्या पश्चिम भागात बोरिवलीच्या उत्तरेला कान्हेरी लेणी आहेत. ही लेणी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या परिसरात आहेत आणि मुख्य उद्यानापासून 6 किमी अंतरावर आहेत. बोरिवली स्टेशन पासून 7 कि.मी. दूर आहेत. या लेण्यांमध्ये बौद्ध कला दिसून येते. पावसाळयात कान्हेरी वॉटरफॉल हा प्रवाहित होतो.
झेनिथ धबधबा
मुंबईपासून जवळ असलेला आणखी एक प्रसिद्ध धबधबा म्हणेज झेनिथ धबधबा. हा धबधबा खोपोली मध्ये आहे. कर्जतमधील खोपोलीजवळ – मुंबईपासून ७३ किमी अंतरावर आहे. पावसाळ्यात या धबधब्याच्या परिसरात हिरवीगार हिरवळ असल्याने, मुंबईकरांसाठी हे सर्वात लोकप्रिय ठिकाणांपैकी (Travel ) एक आहे.
टपालवाडी धबधबा (Travel )
नेरळ रेल्वे स्थानकापासून तीन किलोमीटर अंतरावर असणाऱ्या आनंदवाडी आदिवासी वाडीजवळ हा धबधबा आहे. पोहण्यासाठी एक दोहा देखील येथे आहे. मात्र हे ठिकाण आदिवासी पाड्यांमध्ये असल्यामुळे तुम्हाला येथे जेवणाची सोय उपलब्ध नाही.
आनंदवाडी धबधबा
नेरळ रेल्वे स्थानकापासून अवघ्या ३ ते ४ कि मी अंतरावर असलेला प्रसिद्ध धबधबा म्हणजे आनंदवाडी धबधबा. आनंदवाडी या छोट्या गावालगत असलेल्या डोंगराच्या कुशीत हा धबधबा लपलेला आहे. रिक्षाने अवघ्या १० मिनिटात आनंदवाडी गावात पोहचता येते. गावात खाण्यापिण्याची सोयही (Travel ) होउ शकते.
भिवपुरी धबधबा (Travel )
मुंबई-पुणे पासून जवळ कर्जत तालुक्यातील भिवपुरी या छोट्या शहरामध्ये हा धबधबा आहे. हा भाग पावसाळ्यात धबधब्यांनी फुलून जातो. तुम्ही या धबधब्याला भेट देण्यासाठी भिवपुरी रोड रेल्वे स्टेशनवर देखील उतरून धबधब्याकडे जाऊ शकता. या धबधब्याचे मुख्य आकर्षण (Travel ) म्हणजे याचे पाणी २० फूट उंचावरून कोसळतो.