Travel : महत्वाची बातमी ! मुंबई-नाशिक, शिर्डी आणि पुणे ‘या’ मार्गावरचा प्रवास महागणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Travel : दररोज वापरण्यात येणाऱ्या दळणवळणाच्या साधनांमध्ये ऑटो रिक्षा, टॅक्सी अशा साधनांचा प्रामुख्याने वापर केला जातो. तुम्ही देखील जर टॅक्सी मधून प्रवास करीत असाल तर तुमच्यासाठी ही अत्यंत महत्वाची बातमी आहे. कारण आता मुंबई – नाशिक ,शिर्डी ,पुणे या महामार्गावर धावणाऱ्या टॅक्सिच्या भाड्यामध्ये वाढ करण्यात येणार आहे. त्यामुळे साहजिकच प्रवाशांच्या (Travel) खिशाला मोठी कात्री लागणार आहे.

मुंबई- नाशिक, शिर्डी आणि पुणे या तीनही मार्गावर जाणाऱ्या काळ्यापिवळा टॅक्सी आणि निळ्या सिल्वर वातानुकूलित टॅक्सीच्या भाड्यामध्ये ही सुधारणा करण्यात आली आहे. भाडेवाढी बाबतची ही मान्यता मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीमध्ये घेण्यात आली आहे.

कधीपासून भाडेवाढ ? (Travel)

खरे तर इंधनाच्या दरामध्ये झालेली वाढ पाहता मुंबई टॅक्सी संघटनेने भाडेवाढ करण्याबाबतची मागणी केली होती. ही मागणी लक्षात घेऊन हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे. ही भाडेवाढ ही खटूआ समितीच्या रिपोर्टनुसार देण्यात आली आहे. ही भाडेवाढ कधीपासून सुरू होईल. असा प्रश्न असेल तर ही भाडेवाढ अगदी पुढच्या महिन्यापासूनच सुरू होणार आहे. त्यामुळे वातानुकूलित टॅक्सी मधून प्रवास करताना तुम्हाला पुढच्या महिन्यापासून थोडे जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.

बैठकीमध्ये झालेल्या निर्णयानुसार नाशिकच्या वातानुकूलित टॅक्सी करिता शंभर रुपये शिर्डी (Travel) साठी दोनशे रुपये अधिक मोजावे लागणार आहेत तर मुंबई आणि पुण्याच्या वातानुकूलित साध्या टॅक्सी करता पन्नास रुपये जास्त मोजावे लागणार आहेत.

काय असतील आधीचे आणि नवे दर (Travel)

मुंबई नाशिक – सध्याचा दर 475 रुपये आहे तर नवीन दर 575 रुपये असेल म्हणजेच मुंबई नाशिक मार्गासाठी वातानुकूलित टॅक्सीच्या भाड्यामध्ये शंभर रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

मुंबई शिर्डी – साठी सध्याचा दर हा 625 रुपये इतका आहे तर नवीन दर हा 825 रुपये इतका असेल त्यामुळे मुंबई शिर्डी या मार्गावर तब्बल दोनशे रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

मुंबई पुणे – साध्या टॅक्सीसाठी आत्ताचे दर हे 450 रुपये आहे तर नवीन दर हे 500 रुपये असणार आहे त्यामुळे साध्या टॅक्सीसाठी 50 रुपये वाढवण्यात आले आहेत.

मुंबई पुणे – वातानुकूलित टॅक्सीचा सध्याचा दर हा 525 रुपये इतका आहे तर नवीन दर हा 575 रुपये इतका असेल म्हणजेच मुंबई पुणे वातानुकूलित टॅक्सी साठी सुद्धा पन्नास रुपयांची वाढ करण्यात आली आहे.