Travel : या लेखाचे शीर्षक पाहून नक्कीच तुम्हाला महाराष्ट्रातली एक नाट्यमय राजकीय घडामोड आठवली असेल मात्र आज आम्ही अशाच काहीशा सुंदर निसर्गाने परिपूर्ण असलेल्या एक ठिकणाबद्दल सांगणार आहोत जिथलं वातावरण पाहून तुमचं मन प्रसन्न होईल. सुंदर हिरवीगार झाडे , डोंगर, दऱ्या आणि अधूनमधून जमिनीला स्पर्श करणारं आभाळ …! असा मनमोहक नजारा तुम्हाला येथे अनुभवायला मिळेल. उत्तराखंड येथील रानीखेत या हिल स्टेशनवर. आपल्याकडे उत्तराखंडला देवभूमी म्हणतात. इथली तीर्थस्थळं शिवाय अप्रतिम निसर्ग तुमहाला जणू स्वर्गासम (Travel) भाषातील यात शंका नाही मात्र त्यातही छोटंसं हिलस्टेशन असलेलं रानीखेत निव्वळ लाजवाब आहे. चला ट्राम जाणून घेऊया या ठिकाणाबद्दल…
कॅम्पिंग साठी उत्तम ठिकाण (Travel)
जर तुम्ही राणीखेतला एकदा भेट दिलीत तर पुन्हा पुन्हा इथे जावंसं वाटेल. हे हिल स्टेशन उत्तराखंडच्या कुमाऊंमध्ये आहे आणि निसर्गाच्या कुशीत वसलेले आहे. राणीखेतमध्ये दाट जंगल, देवदार ची उंच झाडं, धबधबे, नद्या आणि सुंदर दऱ्या पर्यटकांना पाहता येतात. उन्हाळ्यातही पर्यटक येथे कॅम्पिंगचा आनंद घेऊ शकतात. हिवाळ्यात राणीखेतमध्ये पर्यटकांना बर्फवृष्टी पाहायला (Travel) मिळते.
मन प्रसन्न करणारी शांतता (Travel)
हे एक शांत हिल स्टेशन आहे आणि इथली शांतता पर्यटकांना सुखावते. जर तुम्हाला शांतता हवी असेल तर तुम्ही एकदा राणीखेतला भेट द्या. दिल्ली ते राणीखेत हे अंतर 376 किलोमीटर आहे. हे राणीखेत हिल स्टेशन समुद्रसपाटीपासून १८०० मीटर उंचीवर आहे. या हिल (Travel) स्टेशनचे हवामान नेहमीच आल्हाददायक असते.
झुला देवी मंदिर
इथून तुम्ही हिमालयाची सुंदर दृश्य बघू शकता. हे हिल स्टेशन नैसर्गिक सौंदर्य आणि सफरचंदाच्या बागांसाठी प्रसिद्ध आहे. येथे तुम्ही झुला देवी मंदिराला भेट देऊ शकता. हे प्रसिद्ध प्राचीन मंदिर आहे. राणीखेतपासून झुलादेवी मंदिर ७ किलोमीटर अंतरावर आहे. येथील चौबटीया गार्डन सुद्धा पाहण्यासारखे आहे. चौबटीया बागेत सफरचंद, बदाम आणि जर्दाळूच्या बागा पाहायला मिळतात. शिवाय तुम्ही राणीखेत (Travel) येथील बिनसार महादेव मंदिराला भेट देऊ शकता. हे मंदिर राणीखेतपासून अवघ्या 19 किलोमीटर अंतरावर आहे.