Travel : कोकणातला ‘हा’ धबधबा म्हणजे निसर्गाची मुक्त उधळणंच ; पाहताक्षणी टेन्शन विसरून जाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Travel : कोकण म्हंटल की सर्वप्रथम सुंदर समुद्रकिनारेच डोळ्यासमोर येतात. पण पावसाळ्यात शक्यतो समुद्र खवळलेला असतो सुरक्षेच्या कारणामुळे समुद्राला जाता येत नाही. पण पावसाळ्यात कोकणात बघण्यासारखी अशी अनेक ठिकाणे आहेत जिथे पर्यटक आवर्जून भेट देतात. कोकणात पावसाळ्यात असंख्य धबधबे प्रवाहित होतात. त्यातील खूप विलोभनीय असलेल्या (Travel ) धबधब्या बद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. आम्ही ज्या धधब्याबद्दल बोलत आहोत तो धबधबा म्हणजे सवतकडा धबधबा.

रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूर तालुक्यातील चुनाकोळवण इथं हा सवतकडा धबधबा आहे. कोकणात पाऊस सुरू झाला की हा धबधबा प्रवाहीत होतो.
सवतकडा धबधबा म्हणजे जवळपास 100 मीटर पेक्षा जास्त उंचीवरून वाहणारा (Travel ) जलप्रपात. तुम्ही जर या धबधब्याच्या पायथ्याशी गेलात आणि नजर वर केलात तर तुम्हाला वरती पाहता येणार नाही कारण उंचावरून पडणाऱ्या पाण्याचे तुषार तुमच्या डोळ्यांवर येत राहतात. येथे जाण्यासाठी थोडीफार जंगलातून वाट काढावी लागते आणि नंतर जे समोर दृश्य दिसते ते दृश्य पाहून तुम्ही नक्कीच आनंदून जाल यात शंका नाही. आजूबाजूचा निसर्गरम्य परिसर उंचावरून कोसळणारे पाणी तुमचा सर्व स्ट्रेस, थकवा दूर करेल.

काय काळजी घ्याल? (Travel )

खरंतर एखाद्या नवख्या ठिकाणी जाताना तेथील स्थानिक रहिवाशांची मदत आणि त्यांना त्या स्थळाबाबतची माहिती विचारून घेणं खूप गरजेचं असतं. तुम्ही या धबधब्याला भेट देणार असाल तर आधी तिथे स्थानिक नागरिकांना याविषयी माहिती मिळवून घ्यायला विसरू नका. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे धबधब्याच्या वरील भागात तीव्र उतार असल्यामुळे पाऊस पडला तर काही मिनिटांमध्ये पाणी मोठ्या प्रमाणात (Travel ) वाहत येते. त्यामुळे अचानक धबधब्याचा प्रवाह वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे पाण्याचा अंदाज न आल्यामुळे पर्यटक वाहून गेल्याच्या घटना सुद्धा इथे घडलया आहे. त्यामुळे सुरक्षित राहूनच पर्यटनाचा आनंद घेणे गरजेचे आहे.

कसे जाल? (Travel )

रत्नागिरी शहरापासून सवतकडा धबधबा साठ किलोमीटरच्या अंतरावर आहे. त्यासाठी रत्नागिरी मधून मुंबई, गोवा महामार्गावरून ओणी शहरापासून आत मध्ये 19 किलोमीटर अंतरावर चुनाकोळवण गाव आहे. तिथून धबधब्याकडे जाणारी वाट आहे कच्चे (Travel ) रस्ते पावसाळ्यात वाहणारे छोटे मोठे झरे हे सर्व अडथळे पार करत तुम्हाला या धबधब्याला भेट द्यावी लागेल. तुम्ही जर रेल्वे मार्गे जाणार असाल तर रेल्वे स्टेशन जवळ उतरल्यानंतर तिथून सवतकडा येथे अंतर हे फक्त 26 ते 30 किलोमीटर आहे. पण या रेल्वे स्टेशनला एक्सप्रेस गाड्या (Travel ) थांबत नाहीत तुम्ही रेल्वे रत्नागिरी स्टेशनला उतरलात तर हायवे ला एसटी महामंडळाच्या बसेस ही येथे येत असतात.