Travel Places : उन्हाळ्यात मुलांसोबत करायची आहे सुट्टी एन्जॉय ? तर भेटी द्या या Eco Friendly ठिकाणांना

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Travel Places : सध्या एप्रिल महिना सुरु आहे. लवकरच मे महिना सुरु होणार असल्यामुळे तुम्ही देखील तुमच्या मुलांसह एका अनोख्या सफारीवर जाऊ इच्छित असाल तर आजच्या लेखात आम्ही तुम्हाला काही भारतातल्या इकोफ्रेंडली ठिकाणांची माहिती देणार आहोत.

डेरिंगबाडी

ओडिसा राज्यातील हे ठिकाण पूर्व घाटावर स्थित आहे. कंदमान जिल्ह्यातील डेरिंगवाडी हे भुवनेश्वर पासून सुमारे 251 किलोमीटर अंतरावर आहे. सुंदर हिल स्टेशन म्हणजे हिरव्या टेकड्या, नद्या आणि धबधबे हे इथलं वैशिष्ट्य. ओडिसा (Travel Places) मधील हिरवेगार सुंदर पर्यटन स्थळ म्हणून या स्थळाचा उल्लेख होतो.

माजुली बेट, आसाम

तुम्ही अनेक समुदावरील बेटे पहिले असतील मात्र माजुली हे जगातील सर्वात मोठे नदी बेट आहे. हे सुंदर बेट (Travel Places) आसाममध्ये आहे. या गोड्या पाण्यातील बेटावर कोणतेही प्रदूषण नाही आणि बेटावर एकेरी वापरल्या जाणार्‍या प्लास्टिकवरही बंदी आहे.

खोनोमा नागालँड

नागालँडमधील खोनोमा गाव हे भारतातील पहिले हरित गाव आहे. पण एक (Travel Places) काळ असा होता जेव्हा खोनोमाचे रहिवासी उपजीविकेसाठी फक्त पक्षी आणि प्राण्यांची शिकार करण्यावर अवलंबून होते. पण, 1990 च्या दशकात, सरकारने शिकारीवर बंदी घातली आणि त्यानंतर लोकांनी ते भारतातील पहिले हरित गाव म्हणून विकसित केले.

थेनमाला, केरळ

केरळला भारतातील देवभूमी असे म्हणतात. केरळ मधील थेनमाला (हनी हिल) हे भारतातील (Travel Places) पहिले इको-टुरिझम केंद्र आहे. केरळमधील कोल्लम आणि त्रिवेंद्रम प्रदेशात स्थित, थेनमाला हे त्रिवेंद्रम शहरापासून सुमारे 70 किमी अंतरावर आहे. येथील लोक मुख्यतः मध आणि रबर यांसारख्या वनजन्य उत्पादनांवर आपला उदरनिर्वाह चालवतात.

सिक्कीम

सिक्कीम म्हणजे निसर्गरम्य परिसराने वेढलेले ठिकाण. हे पहिले भारतीय राज्य आहे ज्याने प्लास्टिकच्या (Travel Places) बाटल्यांवर बंदी घातली आणि लोकांना त्याऐवजी बांबूच्या बाटल्या वापरण्यास प्रोत्साहित केले. हे ठिकाण हिरव्या दऱ्या, सुंदर हिमनद्या, तलाव आणि राष्ट्रीय उद्यानांसाठी प्रसिद्ध आहे.