Travel : आपल्याला माहितीच आहे महाराष्ट्र हा कणखर, राकट आणि डोंगर दऱ्यांनी समृद्ध असा प्रदेश आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगा महाराष्ट्राच्या सौंदर्याला चार चाँद लावतात. त्यात भर म्हणजे या डोंगररांगांमध्ये असलेले गड किल्ले. आजही हे किल्ले महाराष्ट्राच्या भव्य इतिहासाची साक्ष देतात. राज्यात असे अनेक किल्ले आहेत जिथे ट्रेकिंग केले जाते. मात्र आज पण ‘राजमाची’ किल्ल्याच्या ट्रेकिंग (Travel) बद्दल जाणून घेणार आहोत.
सह्याद्रीच्या कुशीत वसलेला किल्ला म्हणजे राजमाची किल्ला. या किल्ल्याला खूप मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. हा किल्ला समुद्रसपाटीपासून 3000 फूट उंचावर आहे. या किल्ल्यावर गेल्यानंतर तुम्हाला मनरंजन आणि श्रीवर्धन असे दोन गड किल्ले पाहायला मिळतात. बोर घाटाच्या उजव्या हाताला मुंबई पुणे महामार्गावरून जेव्हा आपण प्रवास करत असतो तेव्हा हा किल्ला (Travel) आपल्याला दिसतो. ट्रेकिंगची आवड असणाऱ्या पर्यटकांसाठी हे अतिशय प्रसिद्ध असे ठिकाण आहे. लोणावळ्यापासून ह्या ठिकाणी फक्त 16 किलोमीटर अंतरावर आहे. तसेच या किल्ल्यावर जाऊन तुम्हाला मुक्काम करायचा असेल तर खाली असलेल्या उदयवाडी या गावात तुम्ही मुक्काम करू शकता.
श्रीवर्धन किल्ल्यावरून तुम्ही अनेक धबधबे पावसाळ्यात प्रवाहित झालेले पाहू (Travel) शकता. यातील कातळघर धबधबा हा एक सुंदर निसर्गाचा आविष्कार आहे. तुम्हाला जर ट्रेकिंगची आवड असेल तर तुम्ही कोंडाणे लेण्यांकडे ट्रेकिंग करू शकता आणि त्या ठिकाणी सुंदर लेणी आणि धबधब्यांचा आनंद देखील घेऊ शकता.
काय पहाल? (Travel)
उदय सागर तलाव राजमाचीच्या किल्ल्यावर पाहू शकता. या तलावाचं बांधकाम साधारणपणे 1712 मध्ये केलं गेलं असल्याचा म्हंटलं आहे. या तलावाच्या बाजूला महादेवाचे मंदिर देखील आहे.
श्रीवर्धन आणि मनोरंजन गडाच्या जवळ जे पठार आहे त्यावर भैरोबाचे मंदिर (Travel) आहे या ठिकाणाचा कातळ घर धबधबा प्रसिद्ध आहे.
याशिवाय राजमाची हा किल्ला त्याच्या सुंदर लँडस्केप आणि नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रातलं हे एक प्रसिद्ध ट्रेकिंग डेस्टिनेशन म्हणून ओळखलं जातं
कसे जाल? (Travel)
तुम्ही जर रेल्वेने जाणार असाल तर लोणावळा रेल्वे स्टेशनवर तुम्हाला उतरावे लागेल आणि तिथून किल्ल्यावर जाण्यासाठी खाजगी त्या उपलब्ध आहेत जर तुम्हाला मुंबईवरून यायचं असेल तर तुम्ही विमानाने पुण्याला येऊन नंतर टॅक्सीने या किल्ल्याला (Travel) भेट देऊ शकता मुंबई पुणे महामार्गाने देखील राजमाची किल्ल्याला तुम्ही भेट देऊ शकता.