Travel : निसर्गाचा चमत्कार; उलट्या दिशेने वाहतो धबधबा, व्हिडीओ पहाच

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Travel : पावसाळा म्हंटलं की ट्रेकिंग , उंचावरून कोसळणाऱ्या धबधब्यांच्या भेटी , चिंब भिजणं , थंड्गार वातावरणात गरमागरम भजी चा आस्वाद घेणं हे सगळं आपसूक येतंच. अशाच प्रकारचा पावसाळा अनुभवण्यासाठी तरुणाई पावसाळ्याची आतुरतेने वाट पाहत असते. मात्र यंदाच्या वर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीलाच लोणावळा आणि ताम्हिणी घाटात पर्यटक वाहून गेल्याच्या घटना घडल्या त्यामुळे शासनाकडूनही पर्यटन स्थळांवर काही अटी आणि नियम घालून दिले आहेत. अर्थातच ते योग्यच आहेत पण सर्व नियम पाळून सुरक्षितरित्या आपण पावसाळी पर्यटनाचा (Travel) नक्कीच आनंद घेऊ शकतो. म्हणूनच आम्ही आज तुम्हाला अशा एका ठिकाणाबद्दल सांगणार आहोत. जे ठिकाण अतिशय लोकप्रिय असून निसर्गाचा चमत्कारच म्हणावा लागेल.

आम्ही बोलत आहोत सडावाघापूर येथील उलट्या दिशेने वाहणाऱ्या धबधब्याबद्दल… खर तर धबधबा म्हटलं की उंचावरून खाली कोसळणारं पाणी हे चित्र आपल्या डोळ्यासमोर येतं. मात्र निसर्गाचा चमत्कारच म्हणायला हवा की साताऱ्यातलया एका धबधब्याचं पाणी हे उलट्या दिशेने वाहतं. पावसाळ्यातला हाच नजारा पाहण्यासाठी पर्यटकांची एकच गर्दी या ठिकाणी (Travel) होत असते.

साताऱ्यातला हा उलटा धबधबा नेमका कुठे आहे ? साताऱ्यातील तारळे पाटण रोडवर सुमारे 14 किलोमीटरवर असणाऱ्या (Travel) सडावाघापूरला हा उलटा धबधबा आहे. या पॉईंटला रिवर्स पॉईंट असं सुद्धा म्हटलं जातं.

धबधबा उलट्या दिशेने कसा वाहतो ? (Travel)

आता हा धबधबा नेमका उलट्या दिशेने कसा वाहतो ? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर हा धबधबा हा डोंगरदऱ्यांच्या मध्ये आहे. येथे वाहणाऱ्या वाऱ्याचा वेग इतका जास्त असतो की धबधब्यातून खाली येणार पाणी खाली जाण्याऐवजी उलट्या दिशेने वरती वाहतं एवढेच काय तुम्ही एखादी वस्तू इथे या दरीतून खाली सोडली तर ती सुद्धा या वाऱ्याच्या वेगाने वरती येते. आणि हाच नजारा पाहण्यासाठी पर्यटकांची खास गर्दी इथे नेहमी होत असते. मात्र यंदाच्या वर्षी लोणावळ्याची घटना घडल्यानंतर जवळपास राज्यातल्या सर्वच पर्यटन स्थळांवर (Travel) काही अटी नियम तर काही ठिकाणी बंदी सुद्धा घातली आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी तुम्ही हा धबधबा पाहायला जाणार असाल तर सतर्क मात्र रहा.

सध्या सोशल मीडियावर या धबधब्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता या ठिकाणी काही पर्यटक गेलेले आहेत. त्यांनी कंपाउंड मधून खाली दरीमध्ये झाडाच्या फांद्या टाकलेल्या दिसत आहेत. पण या फांद्या उलट्यावरती येताना दिसतात एवढंच काय काठी सुद्धा टाकली असता तरी सुद्धा ती उलटी येताना दिसते. त्यानंतर व्हिडिओमध्ये पुढे आपल्याला उलट्या प्रवाहाने विरुद्ध दिशेने (Travel) वाहणारा धबधबा पाहायला मिळतो आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.