Travel : अनुभवा निसर्गाचं देखणं रूप ! पावसाळ्यात भेट द्या ‘या’ टॉप 5 धबधब्यांना

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Travel : चिंब भिजलेले…! रूप सजलेले …! असंच काहीसं निसर्गाचं बदलेलं रुपडं आपल्याला पावसाळ्यात पाहायला मिळते. पावसाळ्यात धरती हिरवी शाल पांघरते आणि डोंगरांमधून दुधाळ धबधब्यांचे प्रवाह वाहायला सुरवात होते. निसर्गाचे हे सुंदर रूप नेहमीच आठवणीत ठेवण्यासारखे असते. म्हणूनच अनेक निसर्गप्रेमी पावसाळ्यात आवर्जून धबधबे असणाऱ्या ठिकाणांना भेटी (Travel) देत असतात. आजच्या लेखात आम्ही तुम्हाला अशा काही ठिकाणांविषयी सांगत आहोत जिथे अप्रतिम धबधब्यांचे (Waterfall) सौन्दर्य तुम्हाला अनुभवायला मिळेल. चला तर मग जाणून घेऊया…

ठोसेघर धबधबा (Travel)

ठोसेघर धबधबा म्हणजे डोंगरांच्या कुशीतून कोसळणाऱ्या पाण्याच्या धारा तुमचे मन मोहून टाकतील यात शंका नाही. सातारा शहरापासून 25 किलोमीटर अंतरावर हा ठोसेघर धबधबा आहे. हा धबधबा तारळी नदीवर आहे. हा महाराष्ट्रातला सर्वात उंच धबधबा आहे. तर, उंच धबधब्यांच्या यादीत भारतात याचा दुसरा क्रमांक लागतो. यंदाच्या पावसाळ्यात तुम्हला येथे जायचे असेल तर रेल्वेने महाराष्ट्रातल्या (Travel) सातारा स्टेशनवर उतरून, बसने ठोसेघर गावी पोहचा.

कुंडमळा धबधबा (Travel)

पुण्यापासून 30 किमी अंतरावर असलेलं कुंडमळा हे ठिकाण आसपासच्या लोकांमध्ये फारच प्रसिद्ध आहे. इथली शांतता आणि सौंदर्य पर्यटकांसाठी आकर्षणाचं केंद्र आहे. इंद्रायणी नदीवर छोटा बांध घालण्यात आला असून तिथे लहानसा धबधबा तयार झाला आहे. पुण्यापासून जवळच तुम्हाला धबधब्याला भेट द्यायची असेल तर हा चांगला पर्याय आहे.

रंधा धबधबा

भंडारद-यापासून उत्तरेला 10 कि.मी.अंतरावर प्रवरा नदी 50 मीटर खोल दरीत झेपावते. त्या ठिकाणाला रंधा धबधबा म्हणतात. 20कि.मी.च्या प्रवासानंतर अचानक 5० मीटर खोल दरीत प्रवरा झेपावते. तसे पहायला गेल्यास हा धबधबा (Travel) रौद्र आहे.

मढे घाट लक्ष्मी धबधबा

राजगड, रायगड, भाटघर धरण आणि तोरणा किल्ल्याच्या मागील बाजूला मढे घाट धबधबा आहे. हा लक्ष्मी धबधबा म्हणूनही ओळखला जातो. हा धबधबा समुद्रसपाटीपासून (Travel) सुमारे 850 मीटर उंच आहे आणि तोरणा किल्ल्यामागे घनदाट जंगलात आहे.

झेनीथ वॉटरफॉल

मान्सून मध्ये तुम्ही जर मुंबईच्या जवळच्या धबधब्यांना भेट (Travel) देऊ इच्छित असाल तर हा धबधबा उत्तम आहे. हा धबधबा खोपोली जवळ आहे. तुम्ही इथे ट्रेनने जाऊ शकता. येथे जाण्यासाठी तुम्हाला पायी छोट्या छोट्या ओढ्या ओहोळांमधून जावे लागेल. केवळ पावसाळ्यात हा धबधबा प्रवाहित होतो. येथे जाण्यासाठी तुम्हाला छोटा ट्रेक करावा लागेल.