Treasure Found : मानवी हाडांवर सापडले 11000 वर्षांपूर्वीचे दागिने; उत्खननात समोर आल्या भीतीदायक गोष्टी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Treasure Found) जगभरात अशा अनेक गोष्टी आहेत ज्या अत्यंत चमत्कारिक आहेत. ज्यामध्ये वास्तू, वस्तू, नद्या, ठिकाणांचा समावेश आहे. आजपर्यंत अशा अनेक गोष्टींचा सुगावा पुरातत्व शास्त्रज्ञांना लागला आहे. आजपर्यंत अनेक ठिकाणी जमिनीच्या आत खोलवर दडलेली अनेक रहस्य उलगडण्यात पुरातत्व विभागाला यश आलं आहे. अशाच एका डोळे दिपवणाऱ्या घटनेबाबत आज आपण जाणून घेणार आहोत. जमिनीच्या उत्खननात मानवी हाडे, सांगाडे आणि विविध धातू सापडल्याचे ऐकले असेलच. पण यावेळी पुरातत्व खात्याच्या हाताला ११ हजार वर्षांपूर्वीचा खजाना लागला आहे. जाणून घेऊया सविस्तर माहिती.

11 हजार वर्षांपूर्वीचा खजिना (Treasure Found)

जमिनीच्या उत्खननादरम्यान मानवी हाडांसह अनेक प्रकारचे धातु आणि दागिनेही सापडतात. मात्र तुर्कीमध्ये सापडलेला खजाना पाहून सगळ्यांनाच धक्का लागला. कारण, जमिनीखाली सापडलेल्या मानवी हाडांवर हे दागिने सापडले आहेत. याशिवाय आणखी बऱ्याच धक्कादायक गोष्टींचा इथे उलघडा झाला. या दागिन्यांची कार्बन डेटिंग केल्यानंतर हजारो वर्षांपूर्वीपासून चालत आलेल्या कान आणि नाक टोचण्याच्या परंपरेचे काही पुरावे इथे सापडले.

अंकारा विश्वविद्यालयाच्या टीमने या उत्खननातून १०० हून अधिक दागिने शोधून काढले. इतकेच नव्हे तर त्यांच्यावर संशोधन देखील केले. (Treasure Found) आतापर्यंत केलेल्या बऱ्याच संशोधनांवरून असं मानलं जात होतं की, कान आणि नाक टोचण्याची परंपरा ही १०० ते २०० वर्ष जुनी असेल. मात्र, या उत्खननानंतर केलेल्या संशोधनातून असे समोर आले आहे की, ही परंपरा १००० वर्षांपूर्वीदेखील अस्तित्वात होती. तुर्कीतील बोनकुक्लू तरला येथे हा शोध लागला असून अद्याप यावर पुरातत्व शास्त्रज्ञ सखोल अभ्यास करत आहेत.

काय म्हणाले शास्त्रज्ञ?

या संशोधनानंतर पुरातत्व शास्त्रज्ञांनानी सांगितले की, या उत्खननात सापडलेले दागिने हे मानवी हाडांवर सापडले. जे त्यांच्या कानात आणि नाकात सापडले. त्यामुळे हे स्पष्ट होत आहे की, हे दागिने कान आणि नाकात छिद्र करुन परिधान केले जात होते. या शोधात सापडलेल्या दागिन्यांमध्ये ८५ दागिने हे अत्यंत चांगल्या अवस्थेत आढळून आले. (Treasure Found) तर काही दागिन्यांची अवस्था काहीशी खराब होती. यामध्ये चुना दडगं, ओब्सीडियन किंवा नदीच्या दगडांनी बनलेल्या दागिन्यांचा समावेश आहे. मुख्य म्हणजे, हे दागिने केवळ महिला नव्हे तर पुरुषही परिधान करत होते असे दिसून आले आहे.

एका वृत्तानुसार या शोध मोहिमेत सहभागी असलेल्या डॉ. एम्मा बैसल यांनी सापडलेल्या दागिन्यांविषयी बोलताना म्हटले की, ‘ज्या परंपरा अजूनही आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहेत त्या हजारो वर्षांपूर्वी विकसित झाल्या होत्या. साधारण १० हजार वर्ष आधी लोकांनी पश्चिम युरोपमध्ये प्रथम प्रवेश केला आणि तिथे स्थायिक झाले. तेव्हापासून या परंपरा सुरु झाल्या आहेत. तेव्हा माणसाकडे मोती, बांगड्या आणि लॉकेट संबंधित किचकट दागिन्यांचे डिझाईन होते. ज्यात माणसाच्या शरीरातून विकसित प्रतीकात्मक जगाचा देखील समावेश होता.’ (Treasure Found)