Trijata In Ramayana : ‘इथे’ पुजली जाते दैत्यकन्या त्रिजटा; तिच्या दैवी शक्तींना घाबरायचा दशानन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Trijata In Ramayana) आपल्या भारतात प्राचीन अन पुरातन वास्तू, ग्रंथ तसेच पुराणांचे अनन्य साधारण महत्व आहे. यांपैकी एक म्हणजे रामायण. जे वाल्मीकी ऋषींनी रचलेले एक महाकाव्य आहे. रामायणाला हिंदू धर्मात एक पवित्र ग्रंथ मानले जाते. यातील रावणाविषयी आपण सारेच जाणतो. दशानन रावण.. म्हणजे क्रूर अन अहंकारी वृत्तीचे उत्तम उदाहरण मानले जाते. भक्तीचा दुरुपयोग करून मिळवलेले अमरत्व त्याने अहंकारात चुका करून घालवले. कुणालाच न घाबरणारा रावण एक व्यक्तीला घाबरत होता. जिचा उल्लेख रामायणात असूनही आपल्यापैकी बरेच जण तिच्याविषयी अनभिज्ञ आहेत. ती व्यक्ती म्हणजे दैत्यकन्या त्रिजटा. ती कोण होती आणि तिला दशानन का घाबरायचा? याविषयी जाणून घेऊया.

कोण होती त्रिजटा? (Trijata In Ramayana)

त्रिजटा ही रावणाचा बंधू विभिषणची मुलगी होती. तरीही तिच्याबद्दल कुणाला फारशी माहिती नाही. विविध भाषांमध्ये लिहिलेल्या रामायणात तिचा उल्लेख आहे. ज्यात सांगितल्याप्रमाणे, विभीषणाची कन्या अतिशय सुंदर होती. राक्षस कुळात जन्म घेऊनही तिच्या मनाचे सौंदर्य विशेष होते. ती फार हुशार होती असेही यात लिहिले आहे. धार्मिक ग्रंथानुसार, जेव्हा माता सीतेने रावणाच्या महालात राहण्यास नकार दिला तेव्हा त्यांची कैद अशोक वाटिकेत केली गेली. यावेळी रावणाने राक्षसांना आपले रक्षक म्हणून नियुक्त केले आणि त्यांना कडक सूचना दिल्या.

त्रिजटा सर्वांमध्ये ज्येष्ठ होती. शिवाय तिचे पिता विभीषण हे श्रीरामाचे भक्त होते. (Trijata In Ramayana) जेव्हा राक्षसांनी माता सीतेला रावणाशी लग्न करण्याची गळ घातली तेव्हा त्रिजटाने मध्यस्थी केली. माता सीतेसोबतच्या वागणुकीबद्दल त्यांनी सहकारी राक्षसांना फटकारले आणि क्षमा मागायला लावली. ग्रंथानुसार, रावण खूप शूर आणि कुणालाही न घाबरणारा होता. मात्र, असे असूनही तो विभीषणाच्या कन्येला म्हणजेच त्रिजटाला घाबरत होता असे म्हटले जाते.

त्रिजटाला का घाबरायचा रावण?

त्रिजटाला शस्त्रे आणि जादुई क्षमतांचे ज्ञान होते. शिवाय तिच्याकडे दैवी शक्तीदेखील होत्या. वरवर सामान्य दिसणारी त्रिजटा दैवी शक्तींमुळे विशेष होती. (Trijata In Ramayana) तिच्या या दैवी शक्तींबाबत रावण जाणून होता आणि म्हणूनच तो तिला घाबरत होता. त्रिजटाच्या तोंडून निघालेलं विधान कायम सत्य होत असे. तसेच ती भगवान विष्णूंवर निस्सीम प्रेम करायची आणि त्यांची पूजा करायची. याबाबत देखील रावणाला माहिती होती. म्हणूनच रावण त्रिजटाला घाबरत असल्याचे सांगितले जाते.

‘इथे’ आहे त्रिजटाचे मंदिर

माता सीता कैदेत असताना त्रिजटाना त्यांची खूप सेवा केली होती. त्यामुळे माता सीतेने त्रिजटाला वरदान दिले होते की, कार्तिक पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी तिचीही देवीच्या रूपात पूजा केली जाईल. रावणाचा वध झाल्यानंतर माता सीता परत येताना त्यांनी त्रिजटाला सांगितले की, ती काशीत वसेल आणि तिला एक दिवस देवी म्हणून पुजले जाईल. (Trijata In Ramayana) बनारसमध्ये त्रिजटाचे मंदिर असून इथे कार्तिक पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी तिची पूजा केली जाते. धार्मिक मान्यतेनुसार, जो कोणी त्रिजटा राक्षसीची पूजा करतो, ती त्यांचे नेहमी रक्षण करते. यामुळे त्रिजटाच्या दर्शनासाठी या दिवशी भाविक मोठी गर्दी करतात आणि विशेष म्हणजे नैवेद्य म्हणून मुळा आणि वांगी अर्पण केली जातात.