हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेचे अध्यक्ष डोनल्ड ट्रंप यांनी त्यांचे नवीन ‘Trump Gold Card’ व्हिसा प्रोग्राम लाँच केले आहे. यांनी हे कार्ड ‘एअर फोर्स वन’ विमानात दाखवले. तसेच हे कार्ड सुमारे 5 मिलियन डॉलर्स (सुमारे रु 42.5 कोटी) रुपायनाचे असून , यावर ट्रंप यांची छायाचित्र आहे. म्हणूनच याला ‘ट्रंप कार्ड’ असे म्हंटले जात आहे. तसेच ट्रम्प यांनी सांगितले कि , हे कार्ड दोन आठवड्यांच्या आत सर्वांसाठी उपलब्ध केले होईल. तर चला हे कार्ड इतके महाग का आहे अन ते नक्की कसे आहे, याची संपूर्ण माहिती जाणून घेऊयात.
पहिले कार्ड अन त्याच नाव ट्रंप कार्ड –
ट्रंप यांनी हे चमचमीत कार्ड दाखवताना सांगितले कि , “हे 5 मिलियन डॉलर्स (सुमारे 42.5 कोटी रुपये) मध्ये तुमचे होऊ शकते.” आणि हसत हसत ते पुढे म्हणाले कि , “हे पहिले कार्ड आहे, अन त्याच नाव ट्रंप कार्ड” आहे.
कार्डची घोषणा फेब्रुवारी महिन्यात –
हे कार्ड मेटल सारख्या सोनसळी रंगाचं आहे अन यावर ट्रंप यांचा चेहरा आहे. हे कार्ड खरंतर एक कागदपत्र आहे जे परदेशी नागरिकांना अमेरिकेत स्थायिक होण्यासाठी एक सुवर्ण संधी देते. या कार्डची घोषणा फेब्रुवारी महिन्यात केली होती. या कार्डचे वैशिष्ट्य असे कि , कार्ड 5 मिलियन डॉलर्सच्या गुंतवणुकीच्या बदल्यात अमेरिकेतील स्थायिकतेचे हक्क देते , म्हणजेच ग्रीन कार्डसारखी सुविधा. पण , हे कार्ड लगेच नागरिकत्व देत नाही, पण भविष्यात नागरिकत्व मिळवण्यासाठी हा एक मार्ग तयार करू शकतो.
बाजारात कधी उपलब्ध होणार हे कार्ड –
हे कार्ड दोन आठवड्यांपेक्षा कमी वेळात उपलब्ध होईल. म्हणजेच 17-18 एप्रिल पर्यंत हे कार्ड बाजारात उपलब्ध होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे . पण ते कसे मिळवायचं याबद्दल अजून कोणतीही अधिकृत माहिती दिली गेलेली नाही. हे गोल्ड कार्ड पारंपरिक ग्रीन कार्डचा प्रीमियम वर्जन आहे. ग्रीन कार्ड अमेरिकेत कायमस्वरुपी राहण्यासाठी अन काम करण्यासाठी परवानगी देते , पण नागरिकत्व मिळवण्यासाठी एक दीर्घ प्रक्रिया पार करावी लागते, ज्याला “नेचुरलाइजेशन” म्हटले जाते.
कार्डची वैशिष्ट्ये –
पहिले कार्ड ट्रंप स्वतः खरेदी करणार असल्याचे सांगितले.
कार्डाचा डिझाइन सोनेरी रंग, एक बाजूवर ट्रंपची छायाचित्र आहे .
हे व्हिसा केवळ श्रीमंत लोकांसाठी आहे.
या कार्डमुळे अमेरिकेत व्हिसा मिळेल आणि भविष्यात नागरिकत्व मिळण्याची संधी असेल.
EB-5 व्हिसा प्रोग्रामचा पर्याय म्हणून काम करेल.
1,000 गोल्ड कार्ड एका दिवसात विकले गेले.
सरकारचे उद्दिष्ट 2 लाख गोल्ड कार्ड विकण्याचे आहे.
यामुळे अमेरिकेला सुमारे 1 ट्रिलियन डॉलर महसूल मिळण्याची शक्यता.




