हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । TVS Jupiter 110 – तुम्ही जर दमदार फीचर्स अन मॉडेल असलेली स्कूटर घेण्याचा विचार करत असला तर, तुमच्यासाठी हि बातमी महत्वाची ठरणार आहे. टीव्हीएस मोटर्सने (TVS) 2025 मध्ये आपली सगळ्या लोकप्रिय स्कूटर Jupiter 110 चे नवीन अपडेटेड व्हर्जन लाँच केले आहे. तसेच हि गाडी Honda Activa नंतर सर्वात जास्त विक्री होणारी 110cc स्कूटर म्हणून ओळखली जात आहे. हि नवीन लाँच झालेली गाडी फीचर्सनी परिपूर्ण असून, आधुनिक तंत्रज्ञानाचा मेळ आहे. तर चला या दमदार स्कूटर बदल अधिक माहिती जाणून घेऊ.
Jupiter 110 चे नवीन फीचर्स (TVS Jupiter 110) –
नवीन Jupiter 110 मध्ये OBD-2B मानकांसोबत एक इंजिन उपलब्ध आहे, जे पर्यावरणीय तत्त्वांचे पालन करत इंजिन कार्यक्षमता सुधारते. तसेच 113.3cc सिंगल सिलेंडर इंजिन असून, 6500 rpm वर 7.9 bhp आणि 5000 rpm वर 9.2 Nm टॉर्क तयार करते . याला CVT ऑटोमेटिक गिअरबॉक्ससह जोडले गेले आहे, ज्यामुळे वाहनाचा ड्रायव्हिंग अनुभव अधिक आरामदायक बनतो. यासोबतच टॉप व्हेरिअंटमध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह रंगीत एलसीडी इंस्ट्रूमेंट क्लस्टर उपलब्ध आहे. या क्लस्टरमध्ये मॅपमायइंडिया द्वारा टर्न बाय टर्न नेव्हिगेशनची सुविधा देखील आहे. टीव्हीएसने 2025 च्या मार्च अखेरपर्यंत आपल्या संपूर्ण पोर्टफोलिओला OBD-2B मानकांमध्ये रुपांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे. या सेन्सरद्वारे थ्रॉटल रिस्पॉन्स, एअर-ईंधन रेशो, इंजिन तापमान, इंधन पातळी आणि इंजिन वेग यावर रिअल-टाइम डेटा गोळा केला जाईल. यामुळे स्कूटरची कार्यक्षमता आणि इंधन बचत अधिक सुधारेल.
किंमत आणि आकर्षक रंग –
नवीन व्हर्जनची (TVS Jupiter 110) सुरुवातीची किंमत 76,691 रुपये ठेवण्यात आली असून, ही स्कूटर चार व्हेरिअंट्समध्ये उपलब्ध आहे. तसेच नवीन Jupiter 110 सात आकर्षक रंगांमध्ये ग्राहकांना उपलब्ध होणार आहे , त्यामुळे ग्राहकांना रंग निवडण्याचे स्वातंत्र असणार आहे. ग्राहक डॉन ब्लू मॅट, गॅलेक्टिक कॉपर मॅट, स्टारलाइट ब्लू ग्लॉस, टाइटेनियम ग्रे मॅट, द्वाइलाइट पर्पल ग्लॉस, मेटियोर रेड ग्लॉस आणि लूनर व्हाइट ग्लॉस या रंगात गाडी खरेदी करून शकतील .