TVS Jupiter CNG: TVS Jupiter येणार CNG मध्ये; पहा कधी लाँच होणार?

TVS Jupiter CNG
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । TVS Jupiter CNG – टीव्हीएस मोटर्सने (TVS Motor) भारतात त्यांची नवीन CNG Jupiter स्कूटरची लाँचची घोषणा केली आहे, ज्यामुळे बाजारात एक नवीन ट्रेंड सुरू होण्याची शक्यता आहे. या स्कूटरने सर्वांना आश्चर्यचकित केले असून, अनेक ग्राहक Jupiter CNG स्कूटर लाँचची उत्सुकतेने वाट पाहत आहेत. पण कंपनीने अजून लाँचची अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही, त्यामुळे ग्राहकांना अजून थोड्या दिवस वाट पाहावी लागणार आहे. तर चला या भारतात लाँच होणाऱ्या Jupiter CNG स्कूटरचे फीचर्स अन इतर माहिती सविस्तरपणे जाणून घेऊयात.

CNG Jupiter स्कूटरचे दमदार फीचर्स (TVS Jupiter CNG)

टीव्हीएस Jupiter CNG स्कूटरच्या डिझाईनमध्ये मोठा बदल नाही, पण त्यात काही महत्त्वाचे तांत्रिक बदल करण्यात आले आहेत. या स्कूटरमध्ये 124.8cc चे इंजिन आहे, जे 7.1 bhp आणि 9.4 Nm टॉर्क प्रदान करते. या स्कूटरमध्ये 1.4 किलो CNG टाकी आणि 2-लिटर पेट्रोल टाकी दिली आहे, ज्यामुळे वापरकर्त्यांना दोन्ही इंधनाचा वापर करण्याचा पर्याय मिळेल. तसेच या स्कूटरला एकूण 226 किलोमीटरपर्यंत चालवता येणार आहे . CNG च्या वापरामुळे, ही स्कूटर इंधनाच्या बाबतीत फायदेशीर ठरू शकते. Jupiter च्या जुन्या पेट्रोल व्हेरिएंटमध्ये जास्त स्टोरेज स्पेस होते, पण CNG व्हेरिएंटमध्ये CNG टाकी बसवण्यात आल्यामुळे स्टोरेज स्पेस कमी झाला आहे. जेव्हा स्टोरेज स्पेस एक प्राथमिक आवश्यकता असेल, तेव्हा ग्राहकांना पेट्रोल व्हेरिएंटचा विचार करावा लागेल.

लाँच कधी होणार –

ज्या लोकांना कमीत कमी खर्चात अन पर्यावरणास अनुकूल वाहने हवी आहेत, त्यांच्यासाठी TVS Jupiter CNG एक आदर्श पर्याय ठरू शकतो. टीव्हीएसने अजून अधिकृतपणे CNG Jupiter च्या लाँचची तारीख जाहीर केलेली नाही. या स्कूटरचे लाँच 2025 च्या दुसऱ्या तिमाहीत होईल. ग्राहकांना या स्कूटरचा लवकर अनुभव घेण्यासाठी थोडा आणखी वेळ थांबावा लागेल.टीव्हीएस Jupiter CNG स्कूटर पर्यावरणाचे संरक्षण करण्यासोबतच, इंधन खर्च कमी करण्यासही मदत करू शकते. पण , अधिक स्टोरेज स्पेस इच्छिणाऱ्यांसाठी पेट्रोल व्हेरिएंट एक चांगला पर्याय ठरू शकतो.