हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्र सरकार महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी विविध योजनांची आखणी करत असतात. या योजनेच्या माध्यमातून महिलांना ठराविक रक्कम दिली जाते. पण या सर्व योजमानमधील सर्वात महत्वाची योजना म्हणून ‘लखपती दीदी योजनेकडे’ पाहिले जाते. या योजनेत महिलांना बिन व्याजी कर्ज दिले जाते , यामध्ये सुमारे 5 लाख रुपये दिले जाते . या कर्जाचा वापर करून महिलांना त्यांचा स्वतःचा व्यवसाय सुरु करू शकतात अन ज्यामुळे त्यांना आर्थिकदृष्ट्या लाभ मिळण्यास मदत मिळते. तर या योजनेचा लाभ कोणत्या महिलांना घेता येईल अन त्यासाठी पात्रता , अटीशर्ती काय असतील याची संपूर्ण माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.
‘लखपती दीदी योजनेचे’ खास वैशिष्ट्य –
या ‘लखपती दीदी योजनेचे’ खास वैशिष्ट्य असे आहे कि, यामध्ये महिलांना व्यावसायिक ट्रेनिंगदेखील दिले जाते. तसेच या योजनेमध्ये सहभागी होणाऱ्या महिलांना एक स्किल डेव्हलपमेंट ट्रेनिंग प्रोग्राम मिळतो. यामध्ये त्यांना मार्केटिंग, फाइनान्स मॅनेजमेंट, आणि ग्राहकांच्या गरजा कशा पूर्ण कराव्यात यावरही प्रशिक्षित दिले जाते . त्यामुळे त्यांना त्यांचा व्यवसाय उंचीवर घेऊन जाण्यासाठी मदत मिळते.
आवश्यक पात्रता –
या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांचे वय 18 ते 50 वयोगटातील असणे गरजेचे आहे. तसेच हा अर्ज भारतातील कोणतीही महिला करू शकते. पण यामध्ये एक अट ठेवण्यात आली असून , ती अशी कि या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या महिला या बचत गटातील सदस्य असाव्यात. अर्ज सादर करताना, महिलांजवळ काही कागदपत्रे असणे गरजेचे आहे . यामध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड, उत्पन्नाचा दाखला, बँक पासबुक, आणि मोबाईल नंबर बंधनकारक आहेत.
योजनेचे फायदे –
आर्थिक मदत – महिलांना 5 लाख रुपये कर्ज मिळतं ज्यावर कोणतेही व्याज नाही.
प्रोत्साहन आणि मार्गदर्शन – महिलांना व्यवसाय सुरु करण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन मिळतं.
स्किल डेव्हलपमेंट ट्रेनिंग – महिलांना व्यावसायिक कौशल्य शिकवण्यात येतात .
रोजगार निर्मिती – महिलांनी सुरु केलेल्या व्यवसायांमुळे इतरांना रोजगार मिळवून दिला जातो.




