Underwater Hotel : कमाल!! मालदीवच्या समुद्रात 16 फूट खाली बांधलंय लक्झरी हॉटेल; Video एकदा पहाच

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Underwater Hotel) आपण कुठेही बाहेरगावी फिरायला गेलो की सगळ्यात आधी सर्व सोयी सुविधा असलेलं हॉटेल शोधतो. जिथे खाण्यापिण्यापासून राहण्याच्या सर्व सोइ अगदी उत्तम पद्धतीने उपलब्ध असतील. वेगवेगळे हॉटेल वेगवेगळ्या सर्व्हिसेस देतात. प्रत्येकाच्या सर्व्हिसेसची क्वालिटी आणि प्रकार वेगवेगळे असू शकतात. आजपर्यंत तुम्ही अशा अनेक हॉटेलमध्ये गेले असाल. तिथल्या सुविधांचा उपभोग घेतला असाल. पण तुम्ही पाण्याच्या आत असणाऱ्या हॉटेलमध्ये कधी गेलाय का?

सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. ज्यामध्ये काही थक्क करणारे असतात. सध्या सोशल मीडियावर एका हॉटेलचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. जे हॉटेल समुद्राच्या आतमध्ये वसलेले आहे. (Underwater Hotel) या हॉटेलचा नजारा अत्यंत सुंदर आहे. पाहताक्षणी कुणालाही मोहून टाकेल असे हे हॉटेल समुद्राच्या आत असल्यामुळे आणखीच विशेष ठरत आहे. या हॉटेलचा व्हिडीओ एका जोडप्याने शेअर केला आहे. जो पाहून कुणीही साहजिकच अवाक् होईल. आजपर्यंत तुम्ही अनेक मोठमोठी हॉटेल पाहिली असतील पण समुद्राच्या आतील हे हॉटेल अजूबा आहे.

समुद्राच्या खालचं जग कसं असतं? याबाबत कायम प्रत्येकालाच कुतूहल असत. जर याबाबत जाणून घेण्यात तुम्हालाही रस असेल तर मग या हॉटेलमधून दिसणारी समुद्राच्या आतील दृश्य तुमचे लक्ष वेधून घेतील. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर बराच व्हायरल होतो आहे. या व्हिडीओत एक जोडपे दिसत आहे. (Underwater Hotel) हे जोडपे पाण्याच्या आत असलेल्या हॉटेलविषयी माहिती सांगत आहे. या व्हिडीओच्या सुरुवातीला एक तरुण या हॉटेलचा रस्ता दाखवताना दिसतोय. यानंतर तो लिफ्टमध्ये जातो आणि मग सुंदर हॉलमध्ये प्रवेश करते.

‘द मुराका’ (Underwater Hotel)

पुढे तो एका आलिशान बेडरुममध्ये जातो. जिथे मोठा बेड, बसण्याची व्यवस्था, बाथरुम आणि टॉयलेट अशा सुविधा आहेत. हे हॉटेल संपूर्ण समुद्राने वेढलेले आहे. ज्याचे नाव ‘द मुराका’ असे आहे. हे हॉटेल मालदीव येथील कॉनराड मालदीव रंगाली आयलँड रिसॉर्टमध्ये असून समुद्र किनाऱ्यापासून १६ फूट खाली आहे. सोशल मीडिया इंस्टाग्रामवर karaandnate नावाच्या अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये, ‘तुम्हाला येथे राहायचे आहे का?’ असे लिहिले आहे. या व्हिडीओला नेटकऱ्यांनी चांगली पसंती दिली आहे. (Underwater Hotel)