Unhealthy foods to avoid : केक, आईस्क्रीम सारखे पदार्थ लावतात आरोग्याची वाट; होऊ शकतात ‘हे’ गंभीर आजार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Unhealthy foods to avoid) लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांना केक आणि आईस्क्रीम हे पदार्थ खायला आवडतात. कधीही आणि कोणत्याही वेळी केक किंवा आईस्क्रीम दिसलं की तुटून पडणाऱ्यांची कमी नाही. त्यात उन्हाळ्याच्या दिवसांत आईस्क्रीमला विशेष मागणी असते. तुम्हीही केक आणि आईस्क्रीम लव्हर असाल तर ही बातमी अजिबात चुकवू नका. कारण जिभेचे चोचले पुरवणं कधी ना कधी महागात पडतंच. प्रत्येकवेळी चवीचं खाणं आरोग्यासाठी चांगलं असेलच असं नाही. त्यामुळे आजची बातमी विशेष करून केक आणि आईस्क्रीम लव्हर्ससाठी आहे.

केक, बिस्किटे, ब्रेड, दही आणि आइस्क्रीम यांसारखे खाद्यपदार्थ खायला कोणाला आवडत नाही? पण हे पदार्थ खायला जितके मजेशीर वाटत तितके आरोग्यासाठी चांगले नसतात. त्यामुळे हे खाद्यपदार्थ खाताना सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. असे पदार्थ आरोग्याची चांगलीच वाट लावतात. ते कशी? हे जाणून घेऊया.

‘हे’ आजार होऊ शकतात (Unhealthy foods to avoid)

मधुमेहाचा धोका – केक, बिस्कीट, आईस्क्रीम यांसारखे पदार्थ वारंवार खाणे आरोग्यासाठी चांगले नसते. याबाबत सांगतात तज्ञांनी सांगितले की, अशा पदार्थांमध्ये ‘झेंथम’ आणि ‘ग्वार गम’सारखे इमल्सीफायर्स मोठ्या प्रमाणात आढळतात. (Unhealthy foods to avoid) त्यामुळे मधुमेहाचा धोका वाढतो, असे अभ्यासात दिसून आले आहे.

आतड्यांचे आजार – केक, आईस्क्रीम किंवा हवाबंद खाद्य पदार्थाना अधिक काळापर्यंत टिकवण्यासाठी त्यावर विशेष प्रक्रिया केल्या जातात. हे पदार्थ अधिक दिवस आकर्षक दिसावे त्यांची चव चांगली राहावी आणि पोत वाढवून शेल्फ लाइफ वाढवण्यासाठी काही रासायनिक घटक वापरले जातात. (Unhealthy foods to avoid) त्यामुळे असे पदार्थ जास्त खाल्ल्याने आतड्यांचे आजार होऊ शकतात.

प्रोस्टेट कॅन्सरचा धोका – हे पदार्थ अधिक काळ टिकवण्यासाठी वापरले जाणाऱ्या इमल्सीफायर्सचा संबंध स्तन आणि प्रोस्टेटच्या कर्करोगाशी जोडला गेला आहे. त्यामुळे असे पदार्थ खाल्ल्याने या गंभीर आजारांचा देखील धोका वाढतो, असे तज्ञ सांगतात.

विविध आजार – ‘द लॅन्सेट डायबिटीस अॅण्ड एंडोक्राइनोलॉजी’मध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासानुसार, इमल्सीफायर्सचा मोनो आणि डायग्लिसराइड्स ऑफ फॅटी अॅसिडस्, कॅरेजिनन्स, सुधारित स्टार्च, लेसिथिन, फॉस्फेट्स, सेल्युलोज, हिरड्या आणि पेक्टिन्स यांचा टाइप- 2 मधुमेह होण्याच्या जोखमीशी संबंध आहे. (Unhealthy foods to avoid) त्यामुळे असे पदार्थ खाताना विशेष काळजी घ्या.