union budget 2025 : निर्मला सीतारामन यांच्या बजेटमधून शेतकरी, महिला आणि युवकांसाठी मोठ्या घोषणा

0
1
budget for youth
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

union budget 2025 : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2025 चा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले होते की हा बजेट “GYAN” म्हणजेच गरीब, युवा, अन्नदाता (शेती करणारे) आणि नारीशक्ती यांना केंद्रस्थानी ठेवून तयार करण्यात आला आहे. त्यांच्या बजेट भाषणातही याची स्पष्ट छाप दिसली. सरकारने (union budget 2025) या बजेटद्वारे शेतकरी, महिला आणि तरुणांना प्राधान्य देण्याचा प्रयत्न केला आहे.

शेतकऱ्यांसाठी काय? (union budget 2025)

प्रधानमंत्री धनधान्य योजना सुरू करण्याची घोषणा.
100 जिल्यांमध्ये उत्पादनक्षमता वाढवण्यासाठी विद्यमान योजनांचे अभिसरण करून विशेष प्रकल्प राबवला जाणार.
आसाममधील नामरूप येथे 12.7 लाख मेट्रिक टन क्षमतेचा युरिया प्रकल्प उभारला जाणार.
पूर्व भारतातील बंद पडलेले तीन युरिया प्रकल्प पुन्हा सुरू करण्याचा निर्णय, ज्यामुळे भारत युरिया उत्पादनात आत्मनिर्भर होईल.
देशभरातील 7 कोटींहून अधिक शेतकरी, पशुपालक आणि मत्स्यपालकांना “किसान क्रेडिट कार्ड” (KCC) द्वारे अल्पकालीन कर्जपुरवठा सुरू.
KCC ची कर्जमर्यादा 3 लाख रुपयांवरून 5 लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली.
राष्ट्रीय अन्न तंत्रज्ञान, उद्योजकता आणि व्यवस्थापन संस्था बिहारमध्ये स्थापन होणार, जेणेकरून शेतकऱ्यांच्या उत्पादनाची गुणवत्ता सुधारून त्यांना जास्त उत्पन्न मिळू शकेल.
मखाना (फॉक्स नट्स) उत्पादन, प्रक्रिया, मूल्यवर्धन आणि विपणन सुधारण्यासाठी बिहारमध्ये “मखाना बोर्ड” स्थापन केला जाणार.

दलित आणि आदिवासी महिलांसाठी विशेष योजना

SC/ST समुदायातील महिलांना सक्षम करण्यासाठी नवीन योजना जाहीर.
पहिल्यांदाच उद्योजक होणाऱ्या SC/ST समाजातील 5 लाख महिलांना सशक्त करण्याचे उद्दिष्ट.
पुढील 5 वर्षांत 2 कोटी रुपयांपर्यंतचे टर्म लोन उपलब्ध करून देण्याची योजना.

युवकांसाठी काय? (union budget 2025)

युवकांसाठी बजेटमध्ये शिक्षण आणि कौशल्यविकासावर भर.
देशभरात 23 IIT मध्ये सध्या 1.35 लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
IIT पाटना याचा विस्तार केला जाणार.
मेडिकल शिक्षण क्षेत्रात पुढील 5 वर्षांत 75,000 नवीन प्रवेश जागा वाढवण्याची घोषणा.
5 IIT साठी अतिरिक्त पायाभूत सुविधा विकसित केल्या जाणार.
या बजेटमधून मोदी सरकारने सर्वात मोठ्या घटकांना – शेतकरी, महिला आणि तरुणांना आर्थिक स्थैर्य आणि विकासाच्या संधी उपलब्ध (union budget 2025) करून देण्याचा प्रयत्न केला आहे.