Union Cabinet : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज (२८) झालेल्या केंद्रीय कॅबिनेट बैठकीमध्ये एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. देशांतर्गत उत्पादनाला चालना देण्यासाठी, उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा आणि गुजरातमधील धोलेरा प्रमाणे विविध राज्यांमध्ये 12 नवीन औद्योगिक शहरे उभारली जाणार आहेत. या प्रकल्प अंतर्गत 28 हजार 602 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार असून यामुळे थेट दहा लाख लोकांना रोजगार (Union Cabinet) मिळणार आहे.
अर्थसंकल्पात सरकारने उत्पादनाला चालना देण्यासाठी राज्ये आणि खाजगी क्षेत्राच्या भागीदारीत किंवा जवळपास 100 शहरांमध्ये ‘प्लग अँड प्ले’ औद्योगिक पार्क विकसित करण्याची घोषणा केली होती.
8 शहरे आधीच तयार होत आहेत (Union Cabinet)
मिळालेल्या माहितीनुसार आठ शहरे आधीच अंमलबजावणीच्या विविध टप्प्यात आहेत. गुजरातमधील धोलेरा, महाराष्ट्रातील अरिक (औरंगाबाद), मध्य प्रदेशातील विक्रम उद्योगपुरी आणि आंध्र प्रदेशातील कृष्णापट्टणम या शहरांच्या वसाहतीसाठी आधारभूत पायाभूत सुविधा विकसित करण्यात आल्या असून आता उद्योगांसाठी भूखंड वाटपाचे काम सुरू आहे. त्याचप्रमाणे, इतर चार औद्योगिक शहरांमध्ये देखील, सरकारचे विशेष युनिट वाहन रस्ते जोडणी, पाणी आणि वीजपुरवठा यासारख्या मूलभूत पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या प्रक्रियेत (Union Cabinet) आहेत.
या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये रेल्वेच्या तीन पायाभूत प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. याशिवाय मंत्रिमंडळाने कृषी निधीमध्ये वाढ केली आहे. ॲग्री इन्फ्रा फंड 2020 मध्ये सुरू झाला त्याचा निधी एक कोटी रुपये होता. याशिवाय २३४ शहरांमध्ये एफ एम रेडिओ सुविधा सुरू करण्यास मंत्रिमंडळांना मान्यता दिली आहे. यासाठी 730 वाहिन्यांचा लिलाव करण्यात येणार आहे.
रोजगाराची संधी (Union Cabinet)
नॅशनल इंडस्ट्रियल कॉरिडोर डेव्हलपमेंट प्रोग्राम अंतर्गत या क्षेत्रामध्ये अनेक महत्त्वाच्या रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा आहे. नियोजित औद्योगीकरणाद्वारे सुमारे दहा लाख लोकांसाठी प्रत्यक्ष नोकऱ्या आणि 30 लाख लोकांपर्यंत अप्रत्यक्ष नोकऱ्या निर्माण होण्याची शक्यता आहे.
12 नवीन औद्योगिक स्मार्ट शहरे (Union Cabinet)
- राजपुरा, पटियाला
- खुरपिया, उत्तराखंड
- आग्रा, उत्तर प्रदेश
- प्रयागराज, उत्तर प्रदेश
- गया, बिहार
- दिघी बंदर, महाराष्ट्र
- जोधपूर पाली मारवाड
- कोपर्थी, तेलंगणा
- झहीराबाद, तेलंगणा
- ओरवाकल आंध्र प्रदेश
- पल्लकड, केरळ
- J&K किंवा हरियाणातील शहरांची नावे अद्याप उघडकीस नाहीत.