हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतात ज्येष्ठ नागरिकांसाठी एक नवी पेन्शन योजना आणण्याचा मोदी सरकारचा विचार आहे. यामुळे प्रत्येक भारतीय नागरिकाला वृद्धापकाळात आर्थिक सुरक्षा मिळवून देणारी एक यशस्वी योजना सुरू होण्याची शक्यता आहे. अमेरिका, युरोप आणि इतर देशांमध्ये जेथे सरकारी पेन्शन योजनेचा लाभ वृद्ध नागरिकांना मिळतो, तशाच प्रकारे भारतातही ही योजना लागू होण्याची योजना आहे. सरकार नवीन ‘युनिव्हर्सल पेन्शन स्कीम’ राबविण्याच्या प्रयत्नात आहे. या योजनेत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संगठन (EPFO) सोबत मिळून काम करण्यात येणार आहे. ही योजना म्हातारपणातील आर्थिक सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल.
सर्व नागरिकांसाठी नवी ‘युनिव्हर्सल पेन्शन स्कीम’
सर्व नागरिकांना पेंशन मिळवून देण्याच्या या योजनेचा उद्देश, विशेषतः असंघटित क्षेत्रातील कामगारांना आर्थिक सुरक्षा प्रदान करणे आहे. या योजनेतून कामगारांना त्यांच्या कार्यकाळात काही रक्कम जमा करून म्हातारपणात त्यांना नियमित उत्पन्नाची व्यवस्था करण्यात येईल. ही योजना भारतातील आर्थिक समावेशाच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे.
म्हातारपणात आर्थिक सुरक्षा –
“ही योजना कामगारांच्या भविष्याच्या सुरक्षिततेसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. यामुळे कामगारांना म्हातारपणात आर्थिक सुरक्षा मिळेल आणि ते स्वातंत्र्याने जीवन जगू शकतील,” असे एका कामगार संघटनेच्या प्रतिनिधीने सांगितले.
EPFO सोबत मिळून काम –
EPFO हा भारतातील कर्मचारी भविष्य निर्वाह निधी व्यवस्थापनाचा प्रमुख संस्था आहे. EPFO सोबत मिळून या योजनेची रचना आणि अंमलबजावणी केली जाणार आहे. EPFO च्या माध्यमातून कामगारांच्या भविष्य निर्वाह निधीतील रकमेचे व्यवस्थापन केले जाते, ज्यामुळे त्यांना निवृत्तीनंतर आर्थिक सुरक्षा मिळते.
आर्थिक सुरक्षितता –
ही योजना केवळ कर्मचारी वर्गापुरती मर्यादित न राहता सर्व नागरिकांपर्यंत पोहोचणार आहे, ज्यामुळे त्यांच्या म्हातारपणातील जीवनमान सुधारण्यात मदत होईल.