मनाच्या कुपीत जपून ठेवलेली प्रेमकथा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला; ‘अप्सरा’ चित्रपटाचा टिझर रिलीज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। एक अनोखी प्रेमकथा असलेल्या ‘अप्सरा’ या नव्याकोऱ्या मराठी चित्रपटाचा टीजर लाँच करण्यात आला. एका प्रेमकथेला सुरेल संगीताची जोड लाभलेल्या या चित्रपटात अनुभवी आणि नव्या दमाच्या कलाकारांचा दमदार अभिनय पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट येत्या १० मे २०२४ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात चित्रपट गृहात प्रदर्शित होणार आहे. तत्पूर्वी या चित्रपटाचा टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ज्यामध्ये चित्रपटातील कथानकाची एक हलकी झलक दाखवली आहे.

‘अप्सरा’ चित्रपटाचा टिझर

Apsara Official Teaser |  Megha G, Vitthal K, Suyash Z, Mayuri A | Shraman Films | 10May In Cinema

सुनील भालेराव यांच्या ‘श्रमण फिल्म्स’ या निर्मिती संस्थेतर्फे ‘अप्सरा’ चित्रपटाची निर्मिती करण्यात आली असून, त्यांची ही पहिलीच निर्मिती आहे. चित्रपटसृष्टीत अनेक वर्षं कार्यरत असलेल्या चंद्रकांत पवार यांनी या चित्रपटाची कथा, पटकथा आणि दिग्दर्शन केलं आहे. चित्रपटातील तीन गाणी मंगेश कांगणे यांनी केली आहेत. या तीनही गाण्यांचं लेखन आणि संगीत दिग्दर्शन मंगेश यांनी केले आहे. गायक अभय जोधपूरकर गायिका आनंदी जोशी, ओंकार स्वरुप, भैय्या मोरे, मेघा मुसळे यांच्या सुमधुर आवाजात चित्रपटातील गीते स्वरबद्ध करण्यात आली आहेत. राजा फडतरे यांनी कॅमेरामन, निलेश राठोड संकलन तर सुबोध आरेकर, इमरान मालगुणकर,कृतिक माज़िरे यांनी नृत्यदिग्दर्शक म्हणून काम पाहिले आहे.

मुख्य भूमिकेत दिसणार ‘हे’ कलाकार

‘अप्सरा’ या संगीतमय चित्रपटातून अभिनेता सुयश झूंजुरके आणि अभिनेत्री मयूरी आव्हाड हे नवोदित कलाकार मध्यवर्ती भूमिकेत झळकणार आहेत. तर यांच्यासोबत लावण्यवती अभिनेत्री मेघा घाडगे देखील महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. तसेच अक्षता पाडगावकर, शशांक शेंडे, विट्ठल काळे, विजय निकम, मयूर पवार, राजेश भोसले, आशिष वारंग, समीक्षा भालेराव, प्रज्ञा त्रिभुवन, संघर्ष भालेराव आदी कलाकारांच्यादेखील या चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका आहेत.

या चित्रपटाचे कथानक एका तरुणाच्या मनात असलेले एका अप्सरेचे चित्र आणि त्याला भेटणारी तरुणी यांच्याभोवती फिरणारे आहे. प्रेमात पडताच बदलणारं आयुष्य या संकल्पनेवर आधारलेला ‘अप्सरा’ एक प्रामाणिक प्रेमकथेवर भाष्य करतो आहे. प्रेमकथा असल्याने स्वाभाविकपणे सुमधुर गाणी या चित्रपटाचा अविभाज्य भाग आहेत. टीजरवरूनच या चित्रपटाची कथा, अभिनय, संगीत या सगळ्यातलं वेगळेपण अधोरेखित होत आहे. त्यामुळे आता १० मे २०२४ रोजी ‘अप्सरा’ मोठ्या पडद्यावर येण्याची प्रतीक्षा केली जात आहे.