तुमचं आधार कार्ड अजूनही अपडेट केलं नाही का? तर ही तुमच्यासाठी शेवटची आणि सुवर्णसंधी आहे! UIDAI (भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण) ने नागरिकांना १४ जून २०२५ पर्यंत फ्रीमध्ये आधार अपडेट करण्याची सुविधा दिली आहे. ही प्रक्रिया पूर्णतः ऑनलाइन असून, कुठेही जाण्याची गरज नाही आणि कोणतेही शुल्क नाही.
आधार अपडेट का आवश्यक आहे?
UIDAI च्या २०१६च्या नियमांनुसार, प्रत्येक आधारधारकाने दर १० वर्षांनी आपली ओळख (PoI) आणि पत्त्याचा पुरावा (PoA) अपडेट करणं आवश्यक आहे. यामुळे सरकारी योजना, बँक खाती, KYC प्रक्रिया यामध्ये कोणतीही अडचण येत नाही.
कोणकोणती माहिती करता येईल अपडेट?
ही मोफत सेवा मर्यादित माहितीच्या दुरुस्तीसाठी आहे. तुम्ही खालील माहिती अपडेट करू शकता:
- नाव
- जन्मतारीख (ठरावीक मर्यादेपर्यंत)
- पत्ता
- लिंग
- भाषा प्राधान्य
महत्त्वाचे: फिंगरप्रिंट्स, डोळ्यांचे स्कॅन (Iris) किंवा फोटो यासारखे बायोमेट्रिक अपडेट तुम्हाला आधार एनरोलमेंट सेंटरवर जाऊनच करावे लागतील.
ऑनलाइन आधार अपडेट कसं करावं?
- UIDAI च्या वेबसाइटला भेट द्या – https://myaadhaar.uidai.gov.in
- तुमचा आधार क्रमांक आणि OTP वापरून लॉगिन करा
- उजव्या बाजूला “Document Update” या पर्यायावर क्लिक करा
- आवश्यक कागदपत्रे (PoI आणि PoA) अपलोड करा – JPEG, PNG किंवा PDF स्वरूपात, आणि फाईल साइज 2MB पेक्षा जास्त नसावी
- कागदपत्रे नीट तपासा आणि सबमिट करा
- सबमिट केल्यानंतर तुम्हाला एक Service Request Number (SRN) मिळेल, ज्याद्वारे अपडेटची स्थिती पाहता येईल
UIDAI ची ही मोफत सेवा मर्यादित काळासाठीच आहे. त्यामुळे आपली माहिती योग्य आणि अद्ययावत ठेवण्यासाठी ही संधी नक्कीच साधा. सरकारच्या विविध योजनांचा लाभ घ्यायचा असेल, तर आधार अपडेट असणं अत्यावश्यक आहे. वेळेत अपडेट करा आणि त्रासमुक्त राहा.