अमेरिका-चीन टॅरिफ युद्धाचा भारतीयांना जबरदस्त फायदा ! मोबाइल, फ्रिज, टीव्ही होतील स्वस्त

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जगातील दोन आर्थिक महासत्तांमध्ये सुरू असलेल्या अमेरिका-चीन टॅरिफ युद्धाने जागतिक बाजारपेठेतील चिंता वाढवली असली, तरी भारतीय ग्राहकांसाठी ही एक सुवर्णसंधी ठरू शकते. या संघर्षामुळे चिनी इलेक्ट्रॉनिक कंपन्यांनी भारतीय कंपन्यांना तब्बल 5% पर्यंत सवलत देऊ केली आहे, ज्याचा थेट फायदा ग्राहकांना मिळण्याची शक्यता आहे.

भारतात स्वस्त होतील टीव्ही, फ्रिज, मोबाईल!

जर भारतीय कंपन्यांना चिनी कंपन्यांकडून स्वस्तात इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनंट्स मिळाले, तर त्या कंपन्या हा फायदा डिस्काउंटच्या स्वरूपात ग्राहकांपर्यंत पोचवू शकतात. त्यामुळे लवकरच भारतात मोबाईल फोन, रेफ्रिजरेटर, टीव्ही यांसारखे इलेक्ट्रॉनिक प्रॉडक्ट्स स्वस्त होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

चीन भारताला का देतोय सवलत?

रिपोर्टनुसार, अमेरिकेने चीनवर लावलेला 125% टॅरिफ यामुळे चिनी वस्तू अमेरिकेत खूप महाग होतील आणि त्यामुळे तिथे मागणी कमी होण्याचा धोका आहे. त्यामुळे चिनी उत्पादक कंपन्यांवर तणाव निर्माण झाला आहे. यामुळे त्या आता भारतीय बाजारपेठेला आकर्षित करण्यासाठी 5% पर्यंत डिस्काउंट देत आहेत.

टॅरिफचा थेट परिणाम कसा होतो?

उदाहरणार्थ, जर चीनमधील एखाद्या वस्तूची किंमत 100 डॉलर असेल, तर 125% टॅरिफमुळे तीच वस्तू अमेरिकेत 225 डॉलरला विकली जाईल. अशा परिस्थितीत अमेरिकी ग्राहक ती वस्तू घेण्यास नाखूश होतील, आणि चिनी वस्तूंवरील मागणी कोसळू शकते.

अमेरिका-चीन टॅरिफ वॉरची टाइमलाइन

  • 2 एप्रिल: डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर 54% टॅरिफ जाहीर केला
  • चीनचा प्रत्युत्तर: अमेरिकेवर 34% टॅरिफ
  • अमेरिकेचा पुन्हा घाव: चीनवर 104% टॅरिफ
  • चीनचा पलटवार: अमेरिका वर 84% टॅरिफ
  • 9 एप्रिल: ट्रम्प यांनी थेट 125% टॅरिफ लावले जे देश अमेरिकेवर टॅरिफ लावत नाहीत त्यांना ट्रम्प प्रशासनाने सूट देण्याचे संकेतही दिले आहेत ज्यात भारतासारख्या देशांचा समावेश होतो.
    अमेरिका-चीनमध्ये वाढत चाललेला हा टॅरिफ वॉर भारतासाठी एक अवसर ठरू शकतो. इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी भारत हा पर्यायी आणि महत्त्वाचा बाजार ठरत आहे. ग्राहकांनी आता घरबसल्या स्वस्त इलेक्ट्रॉनिक्स खरेदीची तयारी ठेवावी लागेल!