Valentine Special : परदेशी नर्सच्या प्रेमात आकंठ बुडाला होता भारतीय राजा; पैसे देऊन लग्न केलं, मग सोडून दिलं..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। भारताच्या इतिहासात अनेक राजा महाराजांच्या गोष्टींचा समावेश आहे. यांपैकी कित्येक राजा त्यांचे पराक्रम, राज्य विस्तार आणि प्रेम कहाण्यांसाठी आजही प्रसिद्ध आहेत. व्हेलेंटाईन वीकचे औचित्य साधून अशाच एका महाराजाची गोष्ट आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. (Valentine Special) इतर प्रेम कहाण्यांपेक्षा ही वेगळी आणि प्रश्न निर्माण करणारी आहे. मात्र प्रेमासमोर जग दिसत नाही.. या वाक्याला सिद्ध करणारी अशी ही गोष्ट आहे. ही गोष्ट एका भारतीय महाराजांची आहे. जे एका परदेशी नर्सच्या सौंदर्याला इतके भाळले कि तिच्यासोबत लग्न करण्यासाठी त्यांनी पैसे मोजले होते. चला तर जाणून घेऊया या राजाची प्रेमकहाणी.

कोण होता हा राजा?

आपण ज्या भारतीय महाराजांची प्रेम कहाणी जाणून घेणार आहोत ते जिंदच्या भव्य साम्राज्याचे सम्राट होते. त्यांचे नाव महाराजा रणबीर सिंग असे होते. आपल्या काळात ते त्यांच्या शूर पराक्रमासाठी सर्वदूरपर्यंत प्रसिद्ध होते. (Valentine Special) मात्र एका परदेशी नर्सच्या सौंदर्याची त्यांना अशी काही भुरळ पडली की तिच्यासमोर मात्र ते हरले. या नर्सचे नाव ऑलिव्ह असे होते. या राजाच्या आधीच दोन बायका होत्या. मात्र, ऑलिव्हला पाहून तिला राणी नव्हे तर महाराणी बनवायचे असे त्यांनी पक्के केले होते.

पहिली भेट

राजा रणबीर ज्या नर्सच्या प्रेमात बुडाले होते तीचे नाव ऑलिव्ह असे होते. ऑलिव्ह ही मूळ बेल्जियमची. तर बेल्जियमहून ती भारतात कामासाठी वास्तव्यास होती. भारतात एका हॉस्पिटलमध्ये ती रुग्णांची देखभाल करणारी नर्स म्हणून कार्यरत होती. (Valentine Special) दरम्यान, ऑलिव्ह आणि महाराजा रणबीर सिंग यांची पहिली भेट ही मसूरमध्ये झाली. पहिल्या भेटीतचं महाराज पुरते भाळले होते. पुढे जाऊन महाराज इतके अस्थिर आणि अस्वस्थ झाले कि त्यांना ऑलिव्हशिवाय दुसरं काहीचं सुचत नव्हतं का दिसत नव्हतं. आता त्यांना काही करून ऑलिव्हला मिळवायचं होतं. मात्र त्यांच्या प्रेमाचा मार्ग अडथळ्यांनी भरलेला होता.

लग्न करण्यासाठी दिले ५० हजार रुपये

महाराजा रणबीर सिंग यांना काही करून ऑलिव्हला आपली राणी बनवायची होती. हळू हळू त्यांचं प्रेम जिद्द होऊ लागली. राजा ऑलिव्हसोबत लग्न करायला एका पायावर तयार होते. पण ऑलिव्हची आई लिझीला त्यांचा विवाह प्रस्ताव मान्य नव्हता. कारण महाराजा रणबीर सिंग हे शीख धर्माचे होते. तर ऑलिव्ह ख्रिश्चन धर्माची होती. (Valentine Special)

दरम्यान, ऑलिव्हने महाराजांना एक गोष्ट अगदी स्पष्ट केली होती कि, ‘आईच्या विरोधात मी लग्न करणार नाही’. म्हणून महाराज स्वतः तिच्या आईसोबत बोलणी करायला गेले. तेव्हा ऑलिव्हच्या आईने या लग्नासाठी पैशाची मागणी केली. आता प्रेमापुढे त्यांना पैसा किरकोळ वाटत होता. त्यामुळे मागचा पुढचा विचार न करता महाराज रणबीर सिंग यांनी ऑलिव्हच्या आईला त्या काळी तब्बल ५० हजार रुपये दिले होते.

ऑलिव्हला बदलावा लागला धर्म आणि नाव

आईचा होकार मिळताच महाराजा रणबीर सिंग यांनी बेल्जियमच्या ऑलिव्हसोबत खाजगी पद्धतीने लग्न केले. लग्नानंतर ऑलिव्हला तिचा धर्म आणि नाव बदलावे लागले. यानुसार ख्रिश्चन धर्मीय ऑलिव्हने शीख धर्म स्वीकारला. तसेच तिचे ऑलिव्ह हे नाव बदलून जसवंत कौर असे ठेवण्यात आले. इथपर्यंत परिस्थिती ठीक होती. मात्र अडचणी थांबल्या नव्हत्या. (Valentine Special)

व्हाईसरॉय लॉर्ड कर्झनची नाराजी

आईचा होकार मिळाला. लग्न पार पडले. पण तेव्हा भारताचे तत्कालीन व्हाईसरॉय लॉर्ड कर्झन यांनी आपली नाराजी दर्शवली. हे लग्न त्यांना मान्य नव्हते. मात्र महाराजांनी त्यांना ‘आपल्या वैयक्तिक गोष्टीत नाक खुपसू नये’, असे स्पष्ट सांगितले. त्यामुळे लॉर्ड कर्झन यांनी महाराजांवर राग काढण्यासाठी कठोर नियम लागू केला. यानुसार, महाराज रणबीर सिंग यांना आपल्या नव्या राणीला कोणत्याही अधिकृत समारंभात नेण्याची परवानगी नव्हती.

प्रेम संपले.. राजा- राणी वेगळे झाले (Valentine Special)

लग्नानंतर सुरुवातीचे काही दिवस राणी जसवंत कौर आनंदात होती. तिला कोणत्याही प्रकारची कमी नव्हती. दोघांना एक मुलसुद्धा झालं. मात्र, पुढे जाऊन राजा आपल्याला कोणत्याच समारंभात नेत नाही. चारचौघात राणीचा मान देत नाही, ही गोष्ट तिला मनोमन खटकू लागली होती. तर दुसरीकडे, महाराजा रणबीर सिंग यांचेही ऑलिव्हवरील प्रेम आता कुठेतरी कमी होऊ लागले होते. त्यांच्यामध्ये पाहिल्यासारखे आकर्षण उरले नाही.

परिणामी राजा- राणीमध्ये असा काही वाद पेटला कि १९२८ मध्ये ते वेगळे झाले. राणी जसवंत अर्थात ऑलिव्हने महाराजांना थेट घटस्फोट दिला आणि ती आपल्या बाळासोबत लंडनला निघून गेली. आकर्षणातून सुरु झालेलं प्रेम कधी संपलं ते राजालाही समजलं नाही. पुढे वाद वाढले, तणाव वाढला आणि दोघे विभक्त झाले. अशी ही प्रेम कहाणी सुरु झाली पण पूर्ण होऊनही अपूर्ण राहिली.