Valentine Week 2025: रोझ डे !! प्रेम अन् भावना व्यक्त करण्याची एक सुंदर परंपरा

0
2
Valentine Week 2025
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Valentine Week 2025 – फेब्रुवारी महिना म्हणजे प्रेमाचे प्रतीक मानले जाते. याच महिन्यात अनेक लोक आपल्या भावना व्यक्त करत असतात. दरवर्षी या महिन्यात 7 तारखेपासून ते 14 तारखेपर्यंत खास डे साजरे केले जातात. तर आज आहे 7 तारीख … या दिवशी “रोझ डे” साजरा केला जातो. आजच्या दिवशी प्रेम व्यक्त करण्यासाठी गुलाबांचे फूल दिले जाते. जे प्रेमाचे आणि आदराचे प्रतीक मानले जाते. पण प्रत्येक गुलाबाच्या फुलाच्या रंगाचा विशेष असा इतिहास आहे. तर चला या प्रेमाने भरलेल्या फुलाच्या रंगांबद्दल आणि इतिहासाबद्दल माहिती जाणून घेऊयात.

भावना व्यक्त करण्याचे माध्यम ‘ गुलाबाचे फुल’ –

लाल गुलाब –

लाल गुलाब प्रेमाचे प्रतीक म्हणून अनेक काळापासून लोक हे आपल्या जोडीदाराला देत असता.

पिवळा गुलाब – (Valentine Week 2025)

मैत्री आणि आनंद व्यक्त करण्यासाठी या पिवळा गुलाब खास मानले जाते.

पांढरा गुलाब –

निष्ठा, शुद्धता आणि निरागसतेचे प्रतीक म्हणून पांढरे गुलाब दिले जाते.

गुलाबी गुलाब –

कृतज्ञता , कौतुक तसेच गुप्त प्रेमासाठी खास मानले जाते.

नारंगी गुलाब –

नारंगी गुलाब आकर्षण , उत्साह , एखाद्याला प्रेरित करण्यासाठी दिले जाते. (Valentine Week 2025)

प्रत्येक रंगाचे गुलाब, प्रेम, आदर, कृतज्ञता आणि उत्साह व्यक्त करण्याचा एक खास मानले जाते. त्यामुळे 7 फेब्रुवारी हा दिवस अधिक महत्त्वाचा आणि खास मनाला जातो.

‘रोज डे’ साजरा करण्याची परंपरा –

लाल गुलाब हे प्रेम, आदर आणि आपुलकीचे प्रतीक मानले जाते. मुघल कालीन कथा सांगतात की मुघल बादशाह जहांगीर आपल्या पत्नी नूरजहाँला प्रत्येक दिवशी लाल गुलाब देत असे. तसेच, राणी व्हिक्टोरियाने आपल्या पती प्रिन्स अल्बर्टला प्रेम व्यक्त करताना गुलाबांचा गुच्छ दिला होता, आणि या घटनेनंतर ‘रोज डे’ साजरा करण्याची परंपरा सुरू झाली.

विविध रंगांची छटा भावनेचे वेगळेपण दाखवते –

गुलाबाचे फूल (Valentine Week 2025) हे एक सुंदर आणि गोड प्रतीक आहे, जे विविध भावना व्यक्त करण्याचे एक प्रभावी माध्यम म्हणून वापरले जाते. त्याची विविध रंगांची छटा प्रत्येक भावनेचे वेगळे रूप दाखवते. गुलाबाचे फूल हे प्राचीन काळापासून मानवी नातेसंबंध, प्रेम यांचे प्रतीक बनले आहे. हे केवळ एक सुंदर पुष्प नाही, तर ते अनेक भावनांचे प्रतीक आहे. प्रत्येक रंगाची वेगवेगळी गोडी आणि गंध आपल्याला एक अनोखा संदेश देतात. गुलाबाच्या प्रत्येक रंगात एक नवा अर्थ दडलेला असतो, जो ते देणाऱ्याच्या भावना आणि त्याच्या मनाच्या गाभ्यात असलेल्या विचारांची व्यक्तीकरणे करतो.