Valentine’s Day 2024 : यंदाचा ‘व्हॅलेन्टाईन्स डे’ बनवा अविस्मरणीय ; भेटी द्या ‘या’ बजेटफ्रेंड्ली ठिकाणांना

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Valentine’s Day 2024 : प्रेमाचा दिवस म्हणून ‘व्हॅलेन्टाईन्स डे’ अख्ख्या जगभर साजरा केला जातो. या दिवशी आपल्या आयुष्यातील प्रिय व्यक्त्तींसोबत वेळ घालवण्यासाठी किंवा त्या व्यक्तीला एखादे गिफ़्ट देण्यासाठी आधीपासूनच तयारी केली जाते. तुम्ही देखील तुमच्या व्हॅलेन्टाईनला (Valentine’s Day 2024) या दिवशी एक अनोखं गिफ्ट देउ इच्छित असाल तर आम्ही तुम्हाला फिरायला जाण्यासाठीची काही बजेटफ्रेंड्ली आणि अप्रतिम ठिकाणे आजच्या लेखात सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया…

१) हॉर्सले हिल्स Valentine’s Day 2024

आंध्र प्रदेशातील प्रसिद्ध, हॉर्सले हिल्स हे एक आकर्षक, मोहक हिल स्टेशन आहे. विविध प्रकारच्या वनस्पती आणि समृद्धतेने नटलेला असा हा परिसर आहे. येथील टेकड्यांचे वैशिष्टय म्हणजे या टेकड्या समुद्रसपाटीपासून १,२६५ मीटर उंचीवर आहेत. येथे तुम्ही तुमच्या जोडीदारा सोबत क्वालिटी टाइम घालवू शकता.

येथे आणखी काय पहाल?

  • पर्यावरण उद्यान
  • गली बांदा/विंड रॉक
  • कल्याणी वृक्ष
  • जगातील सर्वात मोठे वटवृक्ष, थिम्मम्मा मरीमानु

२)शिलॉंग

शिलॉंग हे नाव ऐकल्यावर शिलॉंग रेडिओची आठवण येते मात्र शिलॉंग ही मेघालायची राजधानी असून हे ठिकाण अतिअशय निसर्गरम्य आहे. देशविदेशातून अनेक पर्यटक याठिकाणी (Valentine’s Day 2024) भेटी देतात. एका हिल स्टेशनवर वसलेले हे ठिकाण आहे. याशिवाय शिलॉंग तिथल्या खास खाद्यसंस्कृतीसाठी सुद्धा प्रसिद्ध आहे.

३)ऋषिकेश

उत्तराखंड मधलं हे प्रसिद्ध ठिकण. हे ठिकाण तीर्थक्षेत्र म्हणून तर प्रसिद्ध आहेच शिवाय हे ठिकाण गिर्यारोहणासाठी सुद्धा प्रसिद्ध आहेत. याबरोबरच तुम्हाला साहसी खेळ खेळायला आवडत असतील तर रिव्हर राफ्टिंग सुद्धा तुम्ही येथे तुमच्या जोडीदारासोबत करू शकता. इथले निसर्ग सौन्दर्य आणि शांतता मनाला प्रसन्नता देते. व्हॅलेन्टाईन्स डे (Valentine’s Day 2024) सेलिब्रेट करण्यासाठी ही ठिकाणे परफेक्ट ठरतील.