Vande Bharat Express : वंदे भारत एक्सप्रेस मध्ये ‘ही’ गोष्ट फ्री मध्ये मिळणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Vande Bharat Express : खूप कमी कालावधीमध्ये लोकप्रिय बनलेली भारतातील वंदे भारत एक्सप्रेस सध्या आणखी एक गोष्टीमुळे चर्चेत आहे. रेल्वेने जारी केलेल्या एका अपडेटनुसार वन्दे भारत एक्सप्रेस (Vande Bharat Express) ने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अर्धा लिटर म्हणजेच ५०० मिली रेल नीरा मोफत मिळणार आहे. मात्र ही सेवा सर्व वंदे भारत एक्सप्रेस साठी लागू नसून केवळ विशिष्ट मार्गावर करणाऱ्या ट्रेन साठी उपलब्ध असेल चला जाणून घेऊया याविषयी अधिक माहिती…

तुम्ही वंदे भारत एक्सप्रेस (Vande Bharat Express) ने प्रवास करीत असाल आणि तुम्हाला भरपूर तहान लागली असेल तर तुम्हाला नि:शुल्क ५०० मिली पाणी मिळू शकते. एवढेच नाही त्यानंतर तुम्ही दुसरी ५०० मिली ची दुसरी बाटली देखील मागू शकता ती देखील तुम्हाला निःशुल्क मिळेल. यापूर्वी वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये पॅकबंद पिण्याच्या पाण्यासाठी प्रवाशांना वेगळे पैसे मोजावे लागत होते. मात्र, तिकिटासह बुक केलेले पाणी आणि नाश्ता यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नव्हते.

‘या’ रेल्वेसाठी निःशुल्क सेवा (Vande Bharat Express)

रेल्वेच्या नव्या अपडेटनुसार ५०० मिली निःशुल्क पाण्याची सेवा ही केवळ देशातील पहिली सेमी हायस्पीड ट्रेन नवी दिल्ली – वाराणसी वंदे भारत एक्सप्रेसमध्ये (Vande Bharat Express) लागू केली जाईल. याबाबत माहिती देताना IRCTC चे मुख्य प्रादेशिक व्यवस्थापक (इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन) अजित कुमार सिन्हा यांनी सांगितले की, वंदे भारत एक्स्प्रेसच्या प्रवाशांकडून अर्धा लिटर पाण्यासाठी शुल्क आकारले जाणार नाही.