vande bharat express : खुशखबर ! पुण्याला मिळणार 4 नव्या वंदे भारत एक्सप्रेस ; कसा असेल रूट ?

pune railway news
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

vande bharat express : भारतातील अल्पावधीत लोकप्रिय झालेली ट्रेन म्हणजे ‘वंदे भारत एक्सप्रेस’. देशभरात वंदे भारतची लोकप्रियता वाढतच आहे. आरामदायी प्रवास ही वंदे भारतची खासियत. म्हणूनच या गाडीला देशभरातून मागणी आहे. वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांमध्ये जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध आहेत. यात अनेक प्रीमियम वैशिष्ट्ये आहेत, ज्यात जलद प्रवास, उत्तम सुविधा आणि सुखद प्रवास यांचा समावेश आहे. या गाड्या आठवड्यातून अनेक वेळा धावतात, ज्यामुळे नियमित प्रवासी तसेच अधूनमधून प्रवाशांनाही सुविधा मिळते. आता पुणेकरांना नव्या 4 वंदे भारत एक्सप्रेस (vande bharat express) मिळणार आहेत. चला जाणून घेऊया त्याबाबत अधिक माहिती.

IT सिटी पुणेला लवकरच आणखी वंदे भारत एक्सप्रेस गाड्या मिळणार आहेत. भारतीय रेल्वेने 28 डिसेंबर 2024 रोजीच घोषणा केली होती की पुण्याला लवकरच आणखी चार वंदे भारत ट्रेन मिळतील आणि त्यांची एकूण संख्या त्यामुळे 6 होईल. पुण्याच्या सध्याच्या वंदे भारत बद्दल सांगायचे तर, सध्या हे शहर कोल्हापूर, हुबळी आणि सोलापूरशी वंदे भारत एक्सप्रेसने (vande bharat express) जोडलेले आहे. आणखी चार वंदे भारत मिळाल्यानंतर या गाड्या इतर चार मार्गांवरही चालवल्या जातील.

कोणत्या मार्गावरून धावणार ? (vande bharat express)

मिळालेल्या माहितीनुसार पुणे-शेगाव, पुणे-वडोदरा, पुणे-सिकंदराबाद आणि पुणे बेलागावी. या मार्गांवर वंदे भारत एक्स्प्रेस धावल्याने बराच वेळ वाचणार असून प्रवाशांची मोठी सोय होणार आहे.

कधीपासून सुरु होणार सेवा ? (vande bharat express)

या प्रस्तावित मार्गांवर वंदे भारत एक्सप्रेस चालवण्याच्या तारखा अद्याप जाहीर करण्यात आलेल्या नाहीत. मात्र ही घोषणाही लवकरच होणार असून त्यामुळे कनेक्टिव्हिटी सुधारेल, असे मानले जात आहे.

पुण्याहून सध्या धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसच्या तिकिटाबद्दल सांगायचे झाल्यास सध्या, पुणे-कोल्हापूर मार्गावर स्टँडर्ड सीटचे भाडे 560 रुपये आहे, तर स्पेशल कोचसाठी तुम्हाला 1135 रुपयांचे तिकीट खरेदी करावे लागेल. त्याचप्रमाणे, पुणे-हुबळी मार्गावरील स्टँडर्ड सीटसाठी तुम्हाला 1530 रुपये मोजावे लागतील, तर स्पेशल कोचचे भाडे 2780 रुपये आहे.

अर्थव्यवस्थेवर होणार परिणाम

पुण्यातील वंदे भारत गाड्यांचा ताफा वाढल्याने प्रवाशांवर तसेच अर्थव्यवस्थेवर सकारात्मक परिणाम होणार आहे. जलद प्रवासाचा अर्थ असा आहे की प्रवासादरम्यान प्रवाशांना कमी त्रास होईल आणि व्यवसायांनाही चांगली कनेक्टिव्हिटी मिळेल. याशिवाय नवीन मार्ग सुरू झाल्याने या भागातील कनेक्टिव्हिटी सुधारेल आणि पर्यटनालाही चालना मिळेल. जलद आणि आरामात प्रवास करून प्रवाशांना येथे पोहोचता येणार आहे. पुण्यातून 4 नवीन वंदे भारत एक्स्प्रेस (vande bharat express) गाड्या धावणे या भागातील रेल्वे प्रवासासाठी गेम चेंजर ठरू शकते. यामुळे शेगाव, वडोदरा, सिकंदराबाद आणि बेळगावी सारख्या भागांसाठी जलद, आरामदायी आणि सुरक्षित प्रवास मार्ग खुले होतील.