vande bharat express : दिल्ली-श्रीनगर वंदे भारत एक्सप्रेस कधीपासून सुरु होणार? अपडेट आली समोर

delhi shrinagar vande bharat
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

vande bharat express :भारतीय बनावटीची आरामदायी प्रवासासाठी प्रसिद्ध असलेली वंदे भारत एक्साप्रेस आता थेट पृथ्वीवरचे स्वर्ग मानल्या जाणाऱ्या काश्मीर पर्यंत जाणार आहे. या ट्रेनची तयारी जवळपास पूर्ण झाली असून लवकरच प्रवाशांना या ट्रेनने प्रवास करता येणार आहे. या खास ट्रेनबाबतचे (vande bharat express) काही अपडेट भारतीय रेल्वेकडून शेअर करण्यात आले आहेत चला जाणून घेऊया

भारतीय रेल्वेकडून मिळालेल्या माहितीनुसार, 20 जानेवारी 2025 नंतर श्रीनगर आणि कटरा (vande bharat express) दरम्यानचा प्रवास सुरू करण्यासाठी सज्ज आहे. काश्मीर खोऱ्यातील कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे ज्यामुळे लोकांना प्रवास करण्यास मदत होते. हिवाळ्यातील सर्वात वाईट परिस्थिती सहजतेने पार करण्यास ही ट्रेन सज्ज असल्याची माहिती देखील देण्यात आली

रेल्वे बोर्डाचे माहिती आणि प्रचाराचे कार्यकारी संचालक दिलीप कुमार यांनी सांगितले की, दिल्ली-श्रीनगर दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये काश्मीर खोऱ्यातील बर्फवृष्टीदरम्यान ट्रेनच्या कामकाजावर परिणाम होणार नाही अशा प्रकारे सुरक्षा उपाय करण्यात आले आहेत.

खास डिझाइन केलेले केबिन (vande bharat express)

लोको पायलटच्या केबिन आणि स्क्रीनची खास रचना करण्यात आली आहे. ट्रेनचे डबे उबदार ठेवण्यासाठी हीटर बसवण्यात आले आहेत. याशिवाय ट्रेनमध्ये वापरलेले पाणी गोठू नये यासाठी स्वतंत्र व्यवस्थाही करण्यात आली आहे.

रेल्वे ट्रॅक आणि चिनाब पूल दोन्ही तयार (vande bharat express)

ही ट्रेन कोणत्या नक्की कोणत्या तारखेपासून सुरू होईल याबाबत अद्याप अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही, परंतु ट्रेनच्या संचालनासाठी आवश्यक असलेल्या सर्व आवश्यकता पूर्ण करण्यात आल्या आहेत. रेल्वे ट्रॅक आणि चिनाब पूल दोन्ही तयार आहेत.

काश्मीर खोऱ्यासाठी खास वैशिष्ट्ये

उत्तर रेल्वेचे प्रधान मुख्य यांत्रिक अभियंता एक चंद्र यांनी सांगितले की, दिल्ली आणि श्रीनगर दरम्यान धावणारी ही ट्रेन इतर वंदे भारत एक्स्प्रेससारखीच आहे परंतु काश्मीर खोऱ्यात धावण्यासाठी ती एका खास पद्धतीने तयार करण्यात आली आहे.

खिडकीवर बर्फ जास्त काळ टिकणार नाही

900 किलोवॅटचे हीटर कोच उबदार ठेवतील. या वंदे भारत एक्सप्रेसच्या खिडक्यांच्या काचा अशा आहेत की बर्फ जास्त काळ टिकणार नाही. याशिवाय या खास वंदे भारत एक्सप्रेस मध्ये काही अतिरिक्त वैशिष्ट्ये जोडण्यात आली आहेत. तापमान योग्य राखण्यासाठी पाण्याच्या टाकीवर सिलिकॉन हीटिंग पॅड बसवण्यात आले आहेत.