Vande Bharat Express : स्वदेशी ‘वंदे भारत’ ट्रेन धावणार परदेशात ; रेल्वे मंत्र्यांनी दिली माहिती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Vande Bharat Express : वंदे भारत एक्सप्रेस ही स्वदेशी सेमी हाय स्पीड ट्रेन भारतात लोकप्रिय झाली आहे. प्रवाशांकडून या ट्रेनला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. मेक इन इंडिया मोहिमेअंतर्गत ही ट्रेन तयार करण्यात आली असून तिची प्रवासी वाहनाची क्षमता ही शताब्दी एक्सप्रेस पेक्षा जास्त आहे. सध्या देशभरामध्ये ८२ ट्रेन धावत असून वंदे भारतचे (Vande Bharat Express) हे स्वदेशी मॉडेल परकीयांच्या सुद्धा पसंतीस उतरले आहे. म्हणूनच लवकरच वंदे भारत परदेशात निर्यात होणार आहे. याबाबतची माहिती एका कार्यक्रमात बोलताना रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे.

याबाबत बोलताना मंत्री वैष्णव म्हणाले की, भारताचे वंदे भारत ट्रेनचे (Vande Bharat Express) डिझाईन हे पूर्णपणे स्वदेशी डिझाईन असून उत्तम कार्यक्षमतेसह हे डिझाईन तयार केले गेले आहे. त्याचबरोबर सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातल्या युनिट्स कडून त्याचं काम झालं आहे आपण भारतीय अभियंतांच्या मदतीने आपल्या देशात वंदे भारत ट्रेन (Vande Bharat Express) तयार करण्याचे आव्हान पूर्ण केले आहे आता ही ट्रेन येत्या काही वर्षांमध्ये निर्यात करण्यात येणार आहे अशी माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.

पुढे बोलताना मंत्री वैष्णव म्हणाले की, सध्या देशभरामध्ये ८२ वंदे भारत एक्सप्रेस (Vande Bharat Express) गाड्या धावत आहेत. आता या गाड्यांचा वेग आणखी वाढवण्याचे काम सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. नवी दिल्ली मुंबई आणि नवी दिल्ली हावडा मार्गे वंदे भारत गाड्या ताशी 160 किलोमीटर वेगाने धावण्यासाठीचा प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी रेल्वे ट्रॅक चांगले तयार केले जात आहेत. दररोज 15 किलोमीटर रेल्वे ट्रॅक तयार होत आहे. यापूर्वी 2004 ते 2014 दरम्यान रोज चार किलोमीटर रेल्वे ट्रॅक (Vande Bharat Express) तयार होत होते मागील दहा वर्षात 41 हजार किलोमीटर रेल्वे नेटवर्क तयार केले गेला आहे. 2004 ते 2014 दरम्यान रेल्वे मधली गुंतवणूक ही 15674 कोटी रुपये होती ती आता 2024- 26 च्या दरम्यान 2 लाख 52 हजार कोटी रुपये झाली आहे.