Vande Bharat Sleeper Train :6 महिन्यांत तयार होणार पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन : रेल्वे मंत्री

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Vande Bharat Sleeper Train : ‘वंदे भारत एक्सप्रेस’ ही साध्य कार चेअर एक्सप्रेस आहे. वंदे भारत ही स्वदेशी ट्रेन असून याला प्रवाशांची मोठी पसंती मिळत आहे. एवढेच नाही ट्रेनचे हे स्वदेशी मॉडेल प्रदेशात एक्स्पोर्ट (Vande Bharat Sleeper Train ) होण्याच्या तयारीत आहे. मात्र आता वंदे भारत च्या फॅन क्लब साठी आणखी एक महत्वाची माहिती आहे. लवकरच वंदे भारत स्लीपर कोच मध्ये उपलब्ध होणार आहे. याबाबतची माहिती खुद्द रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी एका माध्यमाशी बोलताना दिली आहे. ते नक्की काय म्हणले चला जाणून घेऊया…

पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन येत्या सहा महिन्यांत रुळांवर येण्यासाठी सज्ज होऊ शकते, असे केंद्रीय रेल्वेमंत्री (Vande Bharat Sleeper Train ) अश्विनी वैष्णव यांनी सांगितले. यापूर्वी 9 मार्च रोजी, श्री वैष्णव यांनी वंदे भारत स्लीपर कोच बनवण्याच्या प्रगतीची पाहणी करण्यासाठी बेंगळुरू येथील भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड (BEML) सुविधेला भेट दिली होती.

भारतीय रेल्वेमधील सध्याच्या स्लीपर क्लास गाड्यांमध्ये प्रवासी आणि छताच्या दरम्यानची उंची अतिशय अरुंद असल्यामुळे मधल्या आणि वरच्या बर्थमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी अर्गोनॉमिक अडचणी निर्माण होतात ज्यामुळे प्रवाशाला डोक्यावर जागा नसते.

अधिक सोयीस्कर असेल स्लीपर वंदे भारत

वंदे भारत स्लीपर कोच ट्रेन बद्दल बोलताना वैष्न म्हणाले की , “वंदे भारत स्लीपर ट्रेन्सच्या (Vande Bharat Sleeper Train ) नवीन कार बॉडीची उंची अधिक असेल आणि छताचा भाग वायुगतिकीय, स्थिर आणि प्रवाशांसाठी सोयीस्कर बनवण्यासाठी पुन्हा डिझाइन करण्यात आला आहे,” श्री वैष्णव म्हणाले. यापैकी सुमारे 16 डबे असलेल्या वंदे भारत 10 स्लीपर ट्रेन पर्यंत सहा महिन्यांच्या कालावधीत चाचणी कालावधीसाठी सादर केल्या जातील. “चाचण्या यशस्वी झाल्या की, कोचचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन सुरू होईल,” अशी माहिती श्री वैष्णव यांनी दिली. सर्व वंदे भारत स्लीपर ट्रेनमध्ये टक्करविरोधी प्रणाली कवच ​​प्री-फिट केली जाईल, असेही ते म्हणाले.

अंदाजे 67 प्रवासी बसतील (Vande Bharat Sleeper Train )

आंतरराष्ट्रीय स्तरावर, एका कोचची (Vande Bharat Sleeper Train ) निर्मिती खर्च 10 कोटींच्या जवळपास आहे. तथापि, एका वंदे भारत स्लीपर कोचची किंमत सुमारे 8 ते 9 कोटी आहे कारण ट्रेनची रचना स्वदेशी आहे, असे वैष्णव यांनी सांगितले. प्रत्येक कोचमध्ये अंदाजे 67 प्रवासी बसतील. “स्टेनलेस स्टील कार-बॉडी, क्रॅश योग्य डिझाइन घटक, स्वयंचलित बाह्य प्रवासी दरवाजे आणि सेन्सर-आधारित इंटरकम्युनिकेशन दरवाजे ही नवीन स्लीपर ट्रेनची वैशिष्ट्ये आहेत,” अशी माहिती वैष्णव यांनी दिली .

पुढे बोलताना वैष्णव म्हणाले की, प्रवाशांना सहज प्रवेश मिळावा यासाठी ट्रेनमध्ये (Vande Bharat Sleeper Train ) प्रवेश करण्यासाठी सुधार करण्यात आले आहे. टॉयलेटमध्ये नवीन डिझाईन्स आहेत आणि एअर कंडिशनिंगमध्ये देखील चांगले नियंत्रण आहे