Veg Protein Rich Food : ‘या’ व्हेज पदार्थांमधून मिळतं भरपूर प्रोटीन; यांच्यापुढे नॉनव्हेजसुद्धा कमी पडेल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Veg Protein Rich Food) निरोगी जगायचं असेल तर आपल्याला निरोगी पद्धतीची जीवनशैली आत्मसाद करायला हवी. आता नेमकं काय करायचं? असा प्रश्न जर तुम्हाला पडेल तर त्याच उत्तर आहे चिंता करायची नाही. कारण निरोगी राहण्यासाठी खूप काही करण्याची गरज नसते. केवळ आपला आहार आणि दैनंदिन सवयींमध्ये लहान मोठे फरक करायचे. जसं की, लवकर उठणे, व्यायाम करणे, ध्यानधारणा करणे, पौष्टिक आहार घेणे. मात्र प्रत्येकाचं आयुष्य इतक्या स्पीडमध्ये सुरु आहे की, कुणाकडेच इतके छोटे बदल करण्यासाठी सुद्धा वेळ नाही.

आपल्या शरीराला काही महत्वाची जीवनसत्वे आणि पोषक घटकांची गरज असते. (Veg Protein Rich Food) जे आपल्या शारीरिक क्रिया सक्रिय आणि सुरळीत चालू राहण्यासाठी मदत करतात. यांमध्ये प्रोटीन अत्यंत महत्वपूर्ण न्यूट्रिएंड आहे. जे शरीरातील मांसपेशी तयार करण्यापासून ते हाडं निरोगी ठेवण्यापर्यंत विविध प्रकारे आपल्या शरीरासाठी आवश्यक आहे. अनेक लोकांचा असा समज आहे की, केवळ नॉनव्हेज खाल्ल्याने भरपूर प्रोटीन मिळते. पण हा नुसता समज नाही तर हा निव्वळ गैरसमज आहे.

निश्चित स्वरूपात नोंव्हेजमध्ये प्रोटीनची मात्रा चांगली असते. (Veg Protein Rich Food) पण म्हणून व्हेज पदार्थांमध्ये प्रोटीन नसतं असं नाही. तर अनेक व्हेज पदार्थ असे आहेत ज्यामध्ये नॉनव्हेजइतके किंवा त्याहून जास्त प्रोटीन आढळते. त्यामुळे जर तुम्ही शाकाहारी आहात आणि तुम्हाला प्रोटीन हवं असेल तर टेन्शन घेण्याची गरज नाही. कारण आज आम्ही तुम्हाला अशा काही व्हेज पदार्थांची माहिती देणार आहोत, ज्यामध्ये प्रोटीन मोठ्या प्रमाणात असते. चला तर लगेच जाणून घेऊया.

‘या’ व्हेज पदार्थांमध्ये आहे भरपूर प्रोटीन (Veg Protein Rich Food)

1. स्प्राऊट्स (मोड आलेली कडधान्ये) – स्प्राऊट्स म्हणजेच मोड आलेली कडधान्ये. जी प्रोटीनचा उत्तम स्रोत मानली जातात. पोषक तत्वांचे पावर हाऊस म्हणजे स्प्राऊट्स. दिवसभरातून १ कप प्रोटिन्स खाल्ल्याने दिवसभरात शरीराला आवश्यक असणाऱ्या प्रोटीनची मात्रा पूर्ण होते.

2. पिवळी, हिरवी डाळ – (Veg Protein Rich Food) पिवळ्या आणि हिरव्या डाळी प्रोटीनचा उत्तम स्रोत आहेत. कारण यामधून शरीराला साधारण ९ ते १० ग्रॅमपर्यंत प्रोटीन मिळते. यामध्ये हिरवे मूग डाळ आणि चण्याची डाळ अधिक प्रोटीनची मात्रा असणाऱ्या डाळी आहेत.

3. हम्मस – हम्मस हा शाकाहारी पदार्थांमध्ये प्रोटीनचा उत्तम स्रोत मानला जातो. काबुली चण्यापासून बनवला जाणारा हा पदार्थ खाल्ल्याने शरीराला मोठ्या प्रमाणात प्रोटीन मिळते. त्यामुळे शाकाहारी लोकांसाठी प्रोटीन मिळवण्यासाठी हम्मस उत्तम पर्याय मानला जातो.

4. चिया सीड्स- चिया सीड्स म्हणजे सब्जा बी. ज्याला सुपरफूड म्हटले जाते. (Veg Protein Rich Food) या बिया प्लांट बेस्ड प्रोटीन आहेत. योग्य पद्धतीने याचे सेवन नियमित केल्याने शरीराला अधिक प्रमाणात प्रोटीन मिळते.

5. पनीर – पनीर हा शाकाहारी लोकांसाठी प्रोटीनचा एक चांगला पर्याय आहे. पनीरमध्ये प्रोटीनची मात्रा सर्वाधिक असते. त्यामुळे आठवड्यात किमान २ वेळा तरी पनीरचे सेवन करावे. अर्धा कप पनीरमध्ये साधारणतः १२ ग्रॅम प्रोटीन मिळते.

6. नट्स – नट्सच्या माध्यमातून आपल्या शरीराला चांगल्या प्रमाणात प्रोटीन मिळते. नट्समध्ये बदाम, काजू, पिस्ता, अखरोट, पीनट यांचा समावेश होतो. (Veg Protein Rich Food)