Venna Lake : महाबळेश्वरच्या ‘या’ सरोवराचे अप्रतिम सौंदर्य देते काश्मीरलाही टक्कर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Venna Lake) महाराष्ट्रात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढू लागला आहे. जिल्ह्यात उष्णतेने ४० अंश सेल्सिअस पार करून काही दिवसांपूर्वी पारा थेट ४१ अंशावर पोहोचला होता. त्यामुळे राज्यभरात वाहणारे उष्ण वारे गर्मीने हैराण करू लागले आहेत. अशा कडक उन्हाळ्यातही सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरात थंडगार वारे आणि धुक्याची चादर पसरलेली दिसत आहे. त्यामुळे उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये महाबळेश्वरला फिरायला जाणे अनेक लोक पसंत करतात. महाबळेश्वर हे महाराष्ट्राचे मिनी काश्मीर म्हणून ओळखले जाते. कारण येथील वेण्णा लेकचा परिसर आणि त्याचे सौंदर्य खरोखरच काश्मीरलाही तोडीस तोड आहे.

महाबळेश्वरचे वेण्णा लेक (Venna Lake)

सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर हे अत्यंत लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. महाराष्ट्रातील मिनी काश्मीर अशी महाबळेश्वरची विशेष ओळख. इथे कायम पर्यटकांची गर्दी असते. सध्या राज्यभरात उष्ण वारे वाहत असताना महाबळेश्वरचे थंडगार वारे पर्यटकांना बोलावत आहेत. शिवाय येथील नैसर्गिक सौंदर्य आणि पांढरे शुभ्र धुके मनाला एक विशेष आनंद देत आहेत. या ठिकाणी वेण्णा लेक नावाचा एक सुंदर परिसर आहे. जिथे अनेक पर्यटक बोटिंगचा अनुभव घेतात दिसतात.

बोटिंगसाठी प्रसिद्ध

या सरोवराची सफर करताना गहन शांतता अनुभवता येते. (Venna Lake) ही शांतता आणि निसर्गाचे सौंदर्य हीच या सरोवराची खासियत आहे. इथे बोटिंगचा अनुभव घेणे म्हणजे अविस्मरणीय क्षणांची साठवण करणे होय. महाबळेश्वर मधील वेण्णा लेक हा अत्यंत लोकप्रिय असा टुरिस्ट पॉईंट आहे. दाट झाडी, डोंगरातून झुळझुळ वाहणारे झरे, चौफेर डोंगर हे वेण्णा लेकच्या सौंदर्यात आणखी भर टाकतात. त्यामुळे आपण अगदी काश्मीरमध्ये आहोत असाच फील येतो.

काश्मीरचा फील

महाराष्ट्रातील महाबळेश्वराची ख्याती ही थंड ठिकाण अशी आहे. तर वेण्णा लेकचे सौंदर्य महाबळेश्वरला खरोखरच मिनी काश्मीर बनवते. त्यामुळे सह्याद्रीच्या पर्वतरांगेतील सुंदर असा सूर्यास्त आणि वेण्णा लेकमध्ये बोटिंग करण्याचा कमाल अनुभव घेण्यासाठी पर्यटकांची विशेष गर्दी होत असते. (Venna Lake) महाबळेश्वरमधील सनसेट पॉईंट इतकेच वेण्णा लेक प्रसिद्ध आहे. इथे बोटिंग करणाऱ्याला काश्मीरमध्ये बोटिंग करतोय का काय? असेच वाटते. त्यामुळे जर उन्हाळी सुट्टीत मस्त व्हॅकेशन प्लॅन करत असाल तर महाबळेश्वरच्या वेण्णा लेकला जरूर भेट द्या.