Vertical Lift Railway Bridge : भारताच्या विकासात भर घालणारे अनेक नवनवीन प्रोजेक्ट्स हाती घेण्यात आले आहेत. बुलेट ट्रेन , मेट्रो प्रकल्प , रस्ते आणि पूल यांचा यात समावेश आहे. यापैकी काही प्रकल्प पूर्ण झाले आहेत तर काही प्रकल्प पूर्णत्वास येण्याच्या मार्गावर आहेत. आता भारतातील पहिला वर्टिकल लिफ्ट रेल्वे पूल लवकरच पूर्णत्वास येण्याच्या मार्गावर आहे. पुढच्या दोन महिन्यात याची ट्रायल रन (Vertical Lift Railway Bridge) सुरु होणार आहे. याबाबतची माहिती पायाभूत सुविधांसाठीचे रेल्वे बोर्ड सदस्य अनिल खंडेलवाल यांनी जाहीर केली आहे.
एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, खंडेलवाल यांनी पुलाची पाहणी केल्यानंतर हे अपडेट आले आहे. त्यांनी याबाबत सांगितले की बांधकाम 90 टक्के पूर्ण झाले आहे. नवीन पूल सुमारे 2.2 किमी लांबीचा असेल आणि भारताच्या (Vertical Lift Railway Bridge) मुख्य भूभागातील मंडपम शहराला पंबन बेट आणि रामेश्वरमशी जोडेल.
भारतातील पहिला व्हर्टिकल -लिफ्ट रेल्वे सागरी पूल, एक आधुनिक अभियांत्रिकी चमत्कार आहे असे आपण म्हणून शकतो. यामुळे कनेक्टिव्हिटी वाढणार आहे यात शंकाच नाही. रेल विकास निगम लिमिटेड (RVNL) कडून याचा विकास (Vertical Lift Railway Bridge) केला जात असून . यासाठी 535 कोटी रुपये खर्च करण्यात येत आहेत.
समुद्रसपाटीपासून 22 मीटर उंच पूल
समुद्रसपाटीपासून 22 मीटर उंचीवर नेव्हिगेशनल एअर क्लिअरन्ससह व्हर्टिकल लिफ्ट ब्रिज सध्याच्या पुलापेक्षा 3 मीटर उंच असेल. ट्रेन कंट्रोल सिस्टमसह इंटरलॉक केलेल्या इलेक्ट्रो-मेकॅनिकल कंट्रोल सिस्टमचा (Vertical Lift Railway Bridge) वापर करून हा ऑपरेट केला जाईल. पांबन रेल्वे सागरी सेतूमध्ये 99 स्पॅन आहेत, प्रत्येकाची लांबी 18.3 मीटर आहे, तसेच 72.5 मीटरचा एक स्पॅन आहे.
हा रेल्वे पूल मुख्य भूमीला रामेश्वरम, एक ऐतिहासिक दक्षिण भारतीय शहर आणि चार धाम तीर्थस्थानांपैकी एक, उत्तरेकडील बद्रीनाथ, पश्चिमेला द्वारका आणि पूर्वेला पुरीशी जोडतो म्हणून हा पूल खूप महत्त्व आहे. हा पूल परंपरा आणि नवकल्पना यांच्या गतिशील समन्वयाचे उदाहरण देतो, जो भारताच्या विकास (Vertical Lift Railway Bridge) कथेचे वैशिष्ट्य आहे.