Viral Images : अरे बापरे!! आकाशातील विचित्र आकृत्यांमुळे माणसांची घाबरगुंडी; फोटो पाहून विस्फारतील डोळे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Viral Images) या सुंदर प्रकृतीमध्ये कधी कोणती घटना कशा प्रकारे घडेल याबाबत कुणीच कल्पना देऊ शकत नाही. कारण अनेकदा अशा काही घटना घडतात ज्या प्रत्येकाला हैराण करून सोडतात. त्यातील काही घटनांबाबत विविध चर्चा तसेच दंतकथा सांगितल्या जातात. तर काही घटना या डोळ्यासमोर घडणाऱ्या आणि अगदी थक्क करणाऱ्या असतात. अशाच एका घटनेबाबत आज आपण माहिती घेत आहोत. ज्याविषयी ऐकून तुमच्याही मनात शंकेची पाल चुकचुकल्याशिवाय राहणार नाही.

अनेकदा निसर्गाचे चमत्कार हे थक्क करून टाकणारे असतात, यात काहीच शंका नाही. पण कधी कधी निसर्ग काही असे संकेत देतो ज्यामुळे मानवी जीवनावर काहीतरी मोठे संकट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. (Viral Images) असंच काहीसं फ्लोरिडामध्ये झाल्याचं समोर आलंय. टिक टॉक वर एका मच्छीमाराने मोकळ्या आकाशात घडणाऱ्या एका घटनेचा व्हिडिओ शेअर केला आहे. जो पाहून सगळ्यांचे डोळे खुलेच्या खुले राहिले.

काय आहे हा व्हिडिओ? (Viral Images)

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये, आकाशात काही विचित्र आकृत्या तयार झाल्या आहेत. ढगांच्या मध्ये मोठे मोठे खड्डे तयार झाल्यासारखे दिसत आहे. हे खड्डे अत्यंत विचित्र आणि लक्षवेधी ठरले आहेत. एकूणच या आकृत्या पाहून माणसांमध्ये घबराट निर्माण झाली. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत.

नेटकरांच्या प्रतिक्रिया

हा व्हिडिओ टिक टॉकवर blacktiph नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. जो आतापर्यंत अनेक लोकांनी पाहिला आहे. शिवाय यावर अनेकांनी विविध कमेंट केल्या आहेत. यावर एका नेटकऱ्याने कमेंट करताना लिहिले आहे की, ‘हे ढग आहेत की युएफओ? काहीच समजत नाहीये. हे नक्की काय आहे?’ (Viral Images) तर आणखी एका युजरने लिहिले, ‘मी एलियनचे खूप चित्रपट पाहिलेत. पण तरीही हे काय आहे? याबाबत नक्की काहीच सांगू शकत नाही’. तर अन्य एका नेटकीऱ्याने म्हटलं की, ‘आयुष्याच्या ५० वर्षात मी अशी घटना आजपर्यंत कधीच पाहिलेली नाही’. तर अजून एक नेटकरी मनातील भीती व्यक्त करत म्हणालाय, ‘असं वाटतंय की एलियन्स लवकरच आपल्यावर हल्ला करणार आहेत. काहीतरी मोठी दुर्घटना होणार’.

NASA चे स्पष्टीकरण

टिक टॉकवर शेअर करण्यात आलेला हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सोशल मीडिया इंस्टाग्रामवर nasaarth नावाच्या अकाउंटवरून या आकृतीचा एक फोटो शेअर करण्यात आला आहे. सोबत या घटनेचा खुलासा केला गेला आहे. (Viral Images) जानेवारीपासून व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओबाबत स्पेस एजन्सी नासाने प्रतिक्रिया देताना सांगितले की, ‘या विचित्र ढगांची निर्मिती विमानांमुळे होते. जेव्हा विमान ऑल्टोक्यूम्युलस ढगांच्या काठावरुन उडते तेव्हा कॅव्हम ढग तयार होतात. मध्य-स्तरीय ढग ज्यात अतिथंड (पाण्याच्या गोठणबिंदूच्या खाली परंतु तरीही द्रव) पाण्याचे थेंब असतात जसे की हवा विमानाभोवती फिरते तेव्हा एडिबॅटिक विस्तार नावाची प्रक्रिया उद्भवते. थेंब बर्फाच्या स्फटिकांमध्ये गोठतात. बर्फाचे स्फटिक कालांतराने जड होतात आणि आकाशातून पडतात. ज्यामुळे ढगाच्या थराला छिद्र पडतात. ही तीच स्तिती आहे’.