Viral Video : अरे ह्यांना आवरा… ! मुंबईत धावत्या स्कुटरवर कपलचा रोमान्स

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Viral Video :  सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. मुबईतील एका कपलचा स्कुटरवर रोमान्स करतानाचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. मात्र नेटकऱ्यानी या व्हिडिओबद्दल (Viral Video) या कपलवर नाराजी, संताप व्यक्त केला आहे.

या व्हिडीओ मध्ये एक जोडपं चक्क धावत्या स्कुटरवर रोमान्स करतांना दिसत आहे. या व्हिडीओतील तरुण स्कुटर चालवत आहे. तर तरुणी त्याच्या मांडीवर बसली आहे. या दोघांच्या अंगावर शाल पांघरलेली दिसत आहे. कपलचा हा ओपन रोमान्स एका प्रवाशाने (Viral Video) रेकॉर्ड केला आहे. वाहतुकीचे नियम या कपलने धाब्यावर बसवले आहेत.

कुठला आहे व्हिडीओ

हा व्हिडीओ सोशल मीडिया (Viral Video) प्लॅटफॉर्म X वर @bandrabuzz नावाच्या आयडी वरून शेअर करण्यात आला आहे. वांद्रे रेकलेमेशन चा हा व्हिडिओ असून मुंबई पोलिसांनी रस्ते सुरक्षा सुनिश्चित करावी असं या व्हिडिओ शेअर करताना च्या कॅप्शन मध्ये म्हटलं आहे.

व्हिडिओला प्रतिक्रिया

हा व्हिडिओ (Viral Video) अवघा दहा सेकंदाचा आहे मात्र ह्याला हजारो व्ह्यू मिळाले आहेत. या व्हिडिओला पाहून नेटकरांनी अनेक प्रतिक्रिया देखील दिलेल्या आहेत. एका यूजर न पोलिसांनी या कपलवर कारवाई करावी अशी कमेंट केली आहे. तर एका युजरने “त्यांना प्रवासाचा आनंद घेऊ द्या. फक्त नियमाऐवजी कायदा लागू करण्याचा विचार करा” अशी प्रतिक्रिया दिली आहे.