Viral Video : भलताच जुगाड!! वॉशिंग मशीनमध्ये कपड्यांऐवजी धुतले बटाटे; व्हिडीओ पाहून चक्रावून जाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Viral Video) भारतात जुगाडू लोकांची काही कमी नाही. त्यामुळे सोशल मीडियावर कायम काही ना काही जुगाडचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडीओ मजेशीर तर काही व्हिडीओ मात्र अगदी थक्क करणारे असतात. जुगाड करणाऱ्या डोक्याची करावी तितकी वाहवाह कमी वाटते. कुणी घरातल्या टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू बनवत. तर कुणी विटांपासून कूलर तर कधी कोणी सायकलवर चालणारी यंत्र. असाच एक आगळा वेगळा जुगाड यावेळी व्हिडिओच्या माध्यमातून व्हायरल होतो आहे. जो पाहून तुमचं डोकं चक्रावून जाईल.

नेहमी व्हायरल होणाऱ्या व्हिडिओंपेक्षा हा व्हिडीओ जरा वेगळा आहे. (Viral Video) कुणी विचारही केला नसेल असं या माणसाने डोकं चालवलं आहे. या व्हायरल व्हिडीओत आपण पाहू शकतो की वॉशिंग मशीन केवळ कपडे धुण्यासाठी नाही तर आणखी काही गोष्टींसाठी वापरली जाऊ शकते. हा व्हिडीओ पाहून तुमच्या लक्षात येईल की या माणसाने वॉशिंग मशीनचा वापर चक्क किलोभर बटाटे धुण्यासाठी केला आहे. होय. हल्ली बहुतेकांच्या घरी वॉशिंग मशीन दिसते. पण कुणी त्यामध्ये बटाटे धुतल्याचे तुम्ही पाहिले नसेल.

(Viral Video) हा व्हिडीओ इतका व्हायरल होतोय की विचार करणाऱ्या डोक्याबद्दल नेमकं काय बोलावं ते सुचणार नाही. रोजच्या कपड्यांची धुलाई करणारी वॉशिंग मशीन चक्क कपड्यांऐवजी बटाटे धुतेय हे दृश्य फार चकित करणारे आहे. या व्हिडीओत वॉशिंग मशीनचा असा केलेला वापर पाहून तुम्ही आश्चर्यचकित झाले असाल तर ते साहजिक आहे. या व्हायरल व्हिडीओत आपण पाहू शकतो की, आधी मशीनमध्ये बटाटे टाकले आहेत. तसेच जेट स्प्रेद्वारे त्यात पाणी टाकले जात आहे.

मशीनमध्ये बटाट्यांच्या बरोबरीने पाणी येताच त्या व्यक्तीने वॉशिंग मशीन सुरू केली आणि मग काय? मशीनमध्ये कपड्यांसारखे बटाटे फिरू लागले. यामुळे बटाट्याची माती आणि साल आपोआप निघून जाते आहे. आतापर्यंत तुम्ही कपडे धुवायला वॉशिंग मशीन वापरली असेल पण या व्यक्तीने तर बटाटे स्वच्छ करण्यासाठी आणि सोलण्यासाठी तीचा वापर केला आहे. (Viral Video) आहे ना गजब जुगाड? हा व्हिडीओ darbhanga07 नावाच्या इंस्टाग्राम हँडलवर शेअर करण्यात आला आहे. ज्याच्या कॅप्शनमध्ये ‘हे ​​कधीतरी करून पहा’ असे लिहिले आहे. या व्हिडिओवर अनेकांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. यातील काही लोकांनी तर वॉशिंग मशीनला बटाटे सोलण्याचे मशीन म्हटले आहे.