Viral Video : हद्दच झाली!! ट्रेनच्या छतावर प्रेमी युगलाचे चाळे; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Viral Video) सोशल मीडियावर अनेक प्रकारचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. ज्यातील बरेच व्हिडिओ सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतात. त्यांची पसंती मिळवतात. तर काही व्हिडिओ मात्र डोकं फिरवतात. यामध्ये बऱ्याच अंतरंगी जोडप्यांचे व्हिडिओ कायम चर्चेचा विषय ठरतात. आतासुद्धा सोशल मीडियावर एक असा व्हिडिओ व्हायरल होतोय जो पाहून तुम्हाला प्रचंड राग येईल. तुमच्या तळपायाची आग मस्तकात जाईल किंवा मग तुम्हाला लोळून हसू का आणि काय करू? असे वाटेल. चला तर पाहूया हा व्हिडिओ नक्की काय आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक तरुण आणि एक तरुणी रेल्वे ट्रेनच्या छतावर चढले आहेत. एखाद्या बागेत फिरावे असे हे प्रेमी युगुल एकमेकांच्या हातात हात घालून ट्रेनच्या छतावर चालत आहेत. मात्र, एका क्षणानंतर त्यांनी सगळ्याच हद्द पार केल्याचे दिसत आहे. (Viral Video) आजपर्यंत तुम्ही ट्रेनमध्ये सीटवर बसून रोमान्स करणारे बरेच प्रेमीयुगुल पाहिले असतील. पण, हे कपल मात्र ट्रेनच्या छतावर चढून रोमान्स करताना दिसलं. या व्हिडिओतील हे कपल एकमेकांसोबत रोमान्स करण्यात इतकं बिझी आहे की, आसपास कोणी व्हिडिओ करत आहे याचेदेखील त्यांना भान राहिले नाही.

ट्रेनच्या छतावर रोमान्स करण्यात व्यस्त असलेल्या या जोडप्याचा व्हिडिओ प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या एका व्यक्तीने फोनच्या कॅमेरात कैद केला आहे. (Viral Video) हा व्हिडीओ सोशल मीडिया इंस्टाग्रामवर be_harami नावाच्या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओसोबत कॅप्शनमध्ये लिहिलंय, ‘100% प्रेमात आंधळ्या झालेल्या व्यक्ती’. हा व्हिडिओ नेमका कुठला आहे? याबाबत अद्याप समजू शकलेले नाही. मात्र, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर रेल्वे प्रशासनाने काहीतरी कारवाई केली असेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया (Viral Video)

सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी यावर विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी मजेशीर तर काहींनी मात्र संताप व्यक्त केला आहे. एका नेटकऱ्याने म्हटले आहे की, ‘प्रेमात घायाळ पाहिलेले आता आंधळे पण पाहिले’. तर आणखी एका व्यक्तीने या प्रेमी युगलाच्या कृत्यावर संताप व्यक्त करताना कमेंटमध्ये लिहिलंय, ‘ही ट्रेन जर धावत असती तर हे दोघे वाचले नसते’. याशिवाय अन्य अनेक नेटकऱ्यांनी या प्रेमी युगलाच्या स्टंटबाजीवर जाहीरपणे निषेध व्यक्त केला आहे.