Viral Video : तुम्ही ट्राय कराल का हे ऑड कॉम्बिनेशन ? गुलाबजामून पिझ्झा पाहून खवळले नेटकरी

viral video pizza
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Viral Video : खरंतर मूळ इटली मधला व्यंजनाचा प्रकार असलेला पिझ्झा जगभर गाजला आहे. प्रत्येक देशातील वेगवगेळ्या खाद्यसंस्कृतींनुसार पिझ्झा च्य टॉपिंग मध्ये बदल केला जातो. पण तुम्ही कधी पिझ्झा आणि गुलाबजामून असे अतरंगी कॉम्बिनेशन ट्राय केलं आहे काय ? आता तुम्ही म्हणाल हे काय नवीन ? काय डोकं फिरलय काय ? तर सोशल मीडियावर गुलाबजामून पिझ्झा सध्या व्हायरल (Viral Video) होतो आहे.

पिझ्झा एक इटालियन डिश आहे आणि गुलाब जामुन ही प्रसिद्ध भारतीय गोड डिश आहे. लोकांना दोन्ही खूप आवडतात, पण जर कोणी त्यात मिसळून नवीन पदार्थ बनवायचा प्रयत्न केला तर? एका व्यक्तीने हे कृत्य केल्याने मोठ्या संख्येने लोकांनी नाराजी व्यक्त केली. एवढेच नाही तर या व्यक्तीने त्याचा व्हिडीओ (Viral Video) सोशल मीडियावर शेअर केला आहे. रियलफूडलर नावाच्या व्यक्तीने चीझी गुलाब जामुन पिझ्झा बनवला आहे.

काय आहे व्हिडीओ ? (Viral Video)

‘फूडलर’ नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर या नवीन डिशचा व्हिडिओ (Viral Video) शेअर करून कॅप्शनमध्ये लिहिले आहे की “पनीर गुलाब जामुन पिझ्झा भारतात प्रथमच.” हा व्हिडिओ व्हायरल होत असून त्यावर लोकांकडून वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट येत आहेत.एकाने लिहिलंय की भाऊ, दोघांची चव बिघडवायची एवढं काम केलं आहेस, तेव्हा थोडं विष पण घाल. एकाने लिहिले, कोणी सांगू शकेल का, मी माझा देश कसा सोडू? एकाने लिहिले की, ही डिश बनवणाऱ्याला शिक्षा झाली पाहिजे. माफी देता येत नाही.

अशा मूर्खपाणाची गरज नाही (Viral Video)

एका सोशल मीडिया यूजरने लिहिले की, नरकात या लोकांसाठी एक वेगळी नक्षी तयार आहे. गुलाब जामुन हा गोड पदार्थ आहे आणि तसाच खाल्ला जातो. अशा मूर्खपणाची गरज नाही. एकाने लिहिले आहे की भाऊ, मला तुमचे लोकेशन पाठवा, तुम्हाला 302 च्या खाली आत जावे लागेल. एकाने लिहिले की मला हे बघायचे देखील नाही मी काय करू?