Viral Video : बिना वीज झटपट केली इस्त्री ; लोक म्हणतायत, देशाबाहेर नाही गेला पाहिजे हा देशी जुगाड

viral video ironing
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Viral Video : आपल्या देशात भन्नाट डोक्यालिटी असलेल्या माणसांची काय कमी नाही. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स वरून अनेकदा तुम्हालाही त्याचा प्रत्यय येतच असेल. सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ दररोज व्हायरल होत असतात. त्यापैकी अनेक व्हिडीओ हे मनोरंजनात्मक असतात तर अनेक व्हिडीओज मध्ये लोकांनी चालवलेली डोक्यालिटी आणि देशी जुगाड बुचकळ्यात पडतात. आज आम्ही तुम्हाला सोशल मीडियावर (Viral Video) व्हायरल होणाऱ्या अशाच एका व्हिडीओ बद्दल सांगणार आहोत जो व्हिडीओ पाहून तुम्ही सुद्धा म्हणाल , काय झक्कास देशी जुगाड …! चला तर मग जाणून घेऊया या व्हिडीओ बद्दल

काय आहे व्हिडीओ ? (Viral Video)

आपल्याला माहितीच असेल की कपडे इस्त्री करणे म्हणेज मोठे संयमाचे काम. अनेकदा आपण घाईत असतो आणि त्याच वेळेला आपल्याला इस्त्री करावी लागते. मात्र सोशलवर व्हायरल होणाऱ्या व्हीडीमधील या व्यक्तीने देशी जुगाड वापरून आपला (Viral Video) शर्ट इस्त्री केला आहे. तुम्ही व्हिडीओ मध्ये पाहू शकता की, एका व्यक्तीने इस्त्री करण्यासाठी शर्ट किचनमध्ये जमिनीवर ठेवला आहे. मात्र शर्ट इस्त्री करण्यासाठी त्याने चटकन गरमागरम गॅसवरून नुकताच शिटी झालेला कुकर घेतला आणि या कुकरने हा व्यक्ती शर्टाला इस्त्री करतो असा हा व्हिडीओ आहे. हा व्हिडीओ लोकांच्या चांगलाच पसंतीला उतरतो आहे.

View this post on Instagram

A post shared by Deepak Jaiswal (@deepakjaiswal9902)

भन्नाट डोक्यालिटी (Viral Video)

हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर deepakjaiswal9902 नावाच्या अकाऊंटवरून (Viral Video) शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ 6.6 दशलक्ष म्हणजेच 66 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे आणि 78 हजारांहून अधिक लोकांनी तो लाइक केला आहे. यावर कमेंट करताना लोकांनी लिहिले आहे- ही आयडिया भारताबाहेर नाही गेली पाहिजे.