Viral Video : आजोबांसाठी तो बनला थ्री इडियट्सचा रँचो, बाईकवरून गाठला थेट इमर्जन्सी वॉर्ड

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Viral Video : 3 इडियट्स हा अभिनेता अमीर खानचा सुप्रसिद्ध चित्रपट तुम्हाला आठवतोय का ? त्या चित्रपटातला हॉस्पिटल सिन आता खऱ्या खुऱ्या जगात समोर आला असून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल (Viral Video) झाला आहे. हे प्रकरण मध्य प्रदेश मधील सतना जिल्हा रुग्णालयात उघडकीस आले आहे. 3 इडियट्स चित्रपटातील रँचोप्रमाणेच राजूच्या वडिलांना मोपेडवर रुग्णालयात घेऊन जातो. अगदी त्याचप्रमाणे आपल्या आजोबांना या नातवाने बाईकवर बसवून थेट हॉस्पिटलचे इमर्जन्सी वॉर्ड गाठले.

तरुण याच रुग्णालयाचा कर्मचारी (Viral Video)

हा तरुण आपल्या आजारी आजोबांना इमर्जन्सी वॉर्डमध्ये नेण्यासाठी गेला असता हॉस्पिटलच्या गार्डने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र त्याने गार्डचे काहीच ऐकले नाही आणि तो थेट आता घुसला. तरुणाने सांगितले की, आजोबांची प्रकृती खूपच गंभीर होती, त्यामुळे त्याने त्यांना बाईकवर (Viral Video) बसवले आणि सरळ आत नेले. ही घटना शनिवारी रात्री घडली. हॉस्पिटलमध्ये आणणाऱ्या तरुणाचे नाव नीरज गुप्ता असून तो या हॉस्पिटलचा कर्मचारी आहे.कोणीतरी या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ बनवला आणि आता तो व्हायरल होत आहे.

प्रशासन कारवाईच्या तयारीत (Viral Video)

सतना जिल्हा रुग्णालय व्यवस्थापनाने या संपूर्ण प्रकरणाची दखल घेत कारवाई करण्यास सांगितले आहे. सीएमएचओ एलके तिवारी यांनी सांगितले की, ही बाब व्हिडिओद्वारे त्यांच्या निदर्शनास आली आहे. रूग्णांची ने-आण करण्यासाठी रूग्णालयात (Viral Video) वॉर्डनिहाय सुरक्षा रक्षक, स्ट्रेचर व इतर आवश्यक गोष्टींची व्यवस्था आहे, तरीही कोणी असे काम करत असेल तर ते योग्य नाही असे प्रशासनाचे म्हणणे आहे.