Viral Video : हे कसं शक्य आहे ? हात नसताना तरुण चालवतो बाईक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Viral Video : असे म्हणतात इच्छा असेल तर मार्ग दिसेल. तुमच्या मनात एखादी गोष्ट करायची जिद्द असेल तर तुम्हाला नक्कीच यश मिळेल. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओज पैकी हा एक व्हिडीओ तुम्हाला जगण्याची नक्की प्रेरणा देईल यात शंका नाही. आज आम्ही ज्या व्हिडीओ बद्दल सांगणार आहोत यामधील व्यक्तीला दोन्ही हात नाहीत तरीदेखील हा व्यक्ती बाईक चालवतो, एवढेच नाही तर तो बाईक वरून ट्रिपल सीट (Viral Video) सुद्धा जातो. चला जाणून घेऊया सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओबद्दल

काय आहे व्हिडीओ (Viral Video)

अनेकांची मने जिंकणाऱ्या या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती दिसेल ज्याला दोन्ही हात नाहीत, मात्र त्याने बाईक चालवण्याचे तंत्र अवगत केले आहे. या व्यक्तीने स्वत: जुगाड करीत बाईच्या हॅन्डल वर दुसरे हॅन्डल जोडले आहेत. या हॅन्डल ला एक तार जोडली आहे. तारेच्या वरच्या टोकाला एक रिंग आहे, ही रिंग तो आपल्या कोपरांमध्ये अडकवतो. आणि आरामात गाडी चालवतो. एवढेच नाही तर आपल्यासोबत आणखी दोन व्यक्तींना घेऊन हा व्यक्ती बाईक चालवतो. असा हा व्हिडीओ (Viral Video) आहे.

हा व्हिडीओ bapu_zamidar_short या इन्स्टाग्राम अकाउंटवरून व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. असून या व्हिडीओच्या (Viral Video) कॅप्शनमध्ये लिहिलेय, “याला म्हणतात खरा देशी जुगाड” या व्हिडीओवर (Viral Video) अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “भावा अप्रतिम” तर काही युजर्सनी या व्हिडिओला हार्ट दिले आहेत. तर एकाने क्लच कसे दाबणार ? असा सवाल केला आहे.