Viral Video : काय सांगता…! McD च्या कर्मचाऱ्याने चक्कं फ्रेंच फ्राईज वॉर्मरखाली सुकवले फरशी पुसण्याचे मॉप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Viral Video : फास्ट फूड मधील आवडता प्रकार म्हणजे फ्रेंच फ्राईज. जगभरात फ्रेंच फ्राईज चे चाहते काही कमी नाहीत. अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना फ्रेंच फ्राईज आवडतात. त्यातही मॅकडोनाल्ड्सचे फ्रेंच फ्राईज म्हणजे अनेकांचे फेव्हरेट स्नॅक… संपूर्ण जगभरात मॅकडोनाल्ड्सचे चाहते आहेत. पण सोशल मीडियावर सध्या व्हायरल होणारा एक व्हिडीओ जर तुम्ही पहिला तर McD चे फ्रेंच फ्राईज नको रे बाबा …! असे म्हणाल. नक्की काय आहे हा व्हिडीओ ? चला पाहूया …

काय आहे व्हिडीओ ? (Viral Video)

या व्हिडीओ मध्ये मॅकडोनाल्डचा कामगार फ्राय स्टेशनच्या वार्मर खाली चक्क फरशी पुसण्यासाठी वापरला जाणारा ओला मॉप सुकवताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला McD च्या हायजीन बाबत प्रश्न (Viral Video) उपस्थित झाल्याशिवाय राहणार नाही.

मात्र तुम्ही घाबरण्याचे काही कारण नाही कारण हा व्हायरल होणारा व्हिडीओ (Viral Video) भारतातला नसून ऑस्ट्रेलिया मधला आहे. हे दृश्य नक्की कुणी पहिले ? त्याची माहिती सुद्धा समोर आली आहे. डेबी बरकत, ४ एप्रिल रोजी आपल्या मुलासह ब्रिस्बेनमधील बूव्हल मॅकडोनाल्डमध्ये गेली होती तेव्हा तिने हे विचित्र दृश्य पाहिले. तिने एका कर्मचाऱ्याला वॉर्मर लॅम्पखाली आणि फ्राईजपासून फक्त काही इंच वर ओलसर मॉप धरलेले पाहिले. ४ एप्रिल रोजी घडलेली घटना असूनही, रेस्टॉरंटबद्दल अधिक तक्रारी लक्षात आल्यानंतर बरकतने व्हिडिओ शेअर करण्यासाठी सहा आठवड्यांहून अधिक कालावधी घेतला.

याबाबत माहिती देताना Yahoo! न्युज ऑस्ट्रेलियाला बरकत यांनी सांगितले की , “मी माझ्या ऑर्डरची वाट पाहत होतो जेव्हा मी दुसऱ्या स्टाफ सदस्याला असे म्हणताना ऐकले, ‘मला वाटत नाही की तु हे केले पाहिजे, जर त्याने आग लागली तर सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. हा इशारा ऐकून कामगार फक्त हसला.” इतर कर्मचारी तिथेच ऑर्डर पूर्ण करण्यासाठी फ्राईज तळत होता. सुमारे एक मिनिट मॉप-ड्रायिंग करत ती महिला कर्मचारी तिथेच उभी होती. “मी जे पाहिले ते पाहून मला धक्काच बसला आणि तिने हसून दुर्लक्ष केल्याचे (Viral Video) बरकतने सांगितले.

तर दुसरीकडे “आम्ही सुधारात्मक कारवाई करत आहोत याची खात्री बाळगा, त्यामुळे अशी कारवाई पुन्हा होणार नाही,” असे व्यवस्थापकाने उत्तर दिले. “मॅकडोनाल्ड्स अन्न सुरक्षा अत्यंत गांभीर्याने घेते आणि सर्व रेस्टॉरंट्समध्ये कठोर स्वच्छता, स्वच्छता आणि स्वच्छता प्रक्रियांचे पालन करते.” असे म्हंटले आहे.
मॅकडोनल्ड्स सारख्या प्रसिद्ध फ्रॅन्चायजी मध्ये ही घटना घडल्यामुळे एकूणच मॅकडोनाल्ड्सच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह (Viral Video)उभे राहिले आहे.