Viral Video : बाजारात आलाय बाईक इंडिकेटर; अपघात टाळण्यासाठी युवकाने लढवली शक्कल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Viral Video) आजकाल सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी जो तो काही ना काही धडपड करताना दिसतोय. वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून अनेक लोक विविध प्रकारे आपल्या कलाकुसरी सादर करताना दिसतात. यातील बरेच व्हिडिओ चित्र विचित्र देखील असतात. तर काही व्हिडिओ मात्र अत्यंत थक्क करणारे असतात. त्यामुळे सोशल मीडियावर अनेक लोकांचे अनेक व्हिडिओ कायम व्हायरल होत असतात. दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडिओ अत्यंत वेगळा आणि हटके आहे. आजपर्यंत विकसित तंत्रज्ञानाचे अनेक पुरावे तुम्ही पाहिले असतील. पण, हा व्हिडिओ पाहून तुम्ही नक्कीच अचंबित व्हाल.

डिजिटल इंडिकेटर (Viral Video)

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडिओ एका अशा व्यक्तीचा आहे ज्याने बाईकमध्ये एका अनोख्या प्रणालीचा वापर केला आहे. ज्या ठिकाणी बाईकची नंबर प्लेट असते त्या ठिकाणी नंबर प्लेटसह एक विशेष इंडिकेटर लावला आहे. जो तुम्हाला कोणत्या बाजूने जावे लागेल? याच्या सूचना देतो आहे. ही एक डिजिटल पाटी आहे. अनेकदा रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांचे होणारे अपघात हे चुकीच्या दिशेला वाहने वळवल्यामुळे होतात. मात्र, या व्हिडिओत दिसणाऱ्या बाईकचा इंडिकेटर पाहून कदाचित असे अपघात टाळता येतील.

Creators Dhruv नावाच्या सोशल मीडिया हॅण्डलवरून हा व्हिडिओ फेसबुकवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावरील युजर्सचे लक्ष वेधून घेतो आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, या बाईकच्या मागे असलेल्या नंबर प्लेटच्या भागावर जवळपासच्या वाहनांसाठी काही सूचना लिहिल्याचे दिसत आहे. (Viral Video) ही बाईक मागून येणाऱ्या वाहनधारकांना आपली गाडी कशी पास करायची? ते सांगते. ही डिजिटल नंबर प्लेट पलटी होते आणि ती कधी उजव्या बाजूला तर कधी डाव्या बाजूला वळा.. अशा सूचना देते. हा व्हिडिओ पाहून अनेक नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.

नेटकरांच्या प्रतिक्रिया

सोशल मीडिया फेसबुकवर अनेक युजर्स सक्रिय आहेत. त्यामुळे फेसबुकवर व्हायरल झालेला हा व्हिडिओ आतापर्यंत अनेक लोकांनी पाहिला आहे. तर ११ हजाराहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे. या व्हिडिओवर अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया देताना ‘नेक्स्ट जनरेशन इंजीनियरिंग’ असे म्हटले आहे. तर एका युजरने लिहिले आहे, ‘भारतात प्रतिभेची काही कमतरता नाही. हे तंत्रज्ञान भारताबाहेर जाऊन देऊ नका’. तसेच अन्य एकाने लिहिले आहे की, ‘वा मित्रा!! तुझ्या कलाकृतीला खरोखरच सलाम!’ आणखी एकाने म्हटले, ”खरोखरच फार वेगळी आणि भन्नाट कल्पना आहे’. (Viral Video)