Viral Video : बसमध्ये बिकनी गर्ल!! Video पाहून नेटकरी भडकले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Viral Video) सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल काही सांगता येत नाही. आजकाल प्रसिद्धीसाठी लोक काहीही करताना दिसतात. याचा प्रत्यय सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या वेगवेगळ्या व्हिडिओंमधून कायम येत असतो. आताही सोशल मीडियावर असाच एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पब्लिक प्लेस अर्थात सार्वजनिक स्थळावरील असल्यामुळे त्याविषयी जोरदार चर्चा सुरु आहे. या व्हिडिओत एक महिला चक्क बसमध्ये बिकीनी घालून प्रवास करताना दिसतेय.

DTC मध्ये बिकिनी गर्ल

सोशल मीडियावर चर्चेत येण्यासाठी आणि प्रसिद्धी झोतात येण्यासाठी लोक नाही नाही ते प्रयोग करताना दिसतात. तर काही लोक सगळ्याच सीमा ओलांडताना दिसतात. हा प्रकार असाच काहीसा असल्याचे दिसून आले आहे. ही घटना दिल्लीतील सार्वजनिक बसमधला (DTC – Delhi Transport Corporation) असून याचा व्हिडीओ सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होतो आहे. या व्हिडिओत स्पष्ट दिसतंय की, एक महिला बिकीनीत बसमध्ये प्रवेश करतेय. जेव्हा ही महिला बसमध्ये येते तेव्हा प्रवासी तिला पाहून अगदी चकित होऊन जातात. अनेक पुरुष मंडळी मात्र अक्षरशः ओशाळल्याचे या (Viral Video) व्हिडिओत दिसत आहे.

‘त्या’ प्रश्नावरून सहप्रवासी महिलेशी वाद

जेव्हा ही महिला बसमध्ये बिकिनी घालून चढली तेव्हा एका महिलेने तिला ‘तू ठीक आहेस ना?’ असा सवाल केला. हा प्रश्न ऐकून ती महिला इतकी संतापली की प्रश्न विचारणाऱ्या महिलेशी वाद घालू लागली. एक महिला बिकीनीत बसमध्ये चढल्यामुळे काही पुरूष आपल्या जागेवरून उठून दुसरीकडे बस्तान या (Viral Video) व्हिडिओत दिसून आले. तसेच बिकीनी परिधान केलेल्या महिलेने काही आक्षेपार्ह हावभाव केल्याचे काही प्रवाशांनी सांगितले. महिलेच्या अशा पेहरावावर अनेकांनी प्रश्न उठवले तर अनेकांना धक्का बसला. या व्हिडिओवर अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया देताना महिलेच्या कृतीची निंदा केली आहे.

दिल्ली मेट्रोपेक्षा बस अधिक असुरक्षित (Viral Video)

X हॅण्डलवर DELHIBUSES नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिलंय, ‘दिल्लीतील बस व्यवस्था पूर्णपणे दुरवस्थेत आहे. दिल्ली मेट्रोपेक्षा दिल्लीच्या बस अधिक असुरक्षित आहेत. ही एक छोटीशी घटना आहे. मात्र, दररोज बसमध्ये शेकडो लोकांची पाकीट कापली जात आहेत. याला जबाबदार कोण…?’ या व्हायरल व्हिडीओमुळे (Viral Video) एकंदरच नव्या चर्चा आणि कदाचित वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. या घटनांवर रोख लावण्यासाठी सरकार काही पाऊले उचलणार का? याकडे लक्ष देणे आता गरजेचे आहे.