Viral Video : बेफिकीरपणाची हद्द पार!! स्कूटीच्या फूटरेस्टवर उभ्या लहान मुलाचा VIDEO व्हायरल; नेटकरी भडकले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Viral Video) तुम्ही कोणते वाहन चालवता यापेक्षा तुम्ही ते कसे चालवता हे महत्वाचे असते. रस्त्यावर कोणतेही वाहन चालवतेवेळी ट्रॅफिकचे नियम आणि आवश्यक त्या गोष्टींचे पालन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी असते. यामधून कुणाचीही सुटका नसते. यासाठी सरकारने काही महत्वाचे नियम घालून दिले आहेत. मात्र अनेक लोक या नियमांची कायम पायमल्ली करताना दिसतात. खरंतर हे नियम आपल्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तयार करण्यात आले आहेत. तरीही लोक मात्र अतिशय बेफिकीरपणाने वागताना दिसतात. सध्या एक असाच अत्यंत बेफिकीर आणि निष्काळजीपणाचा हद्द पार केलेला व्हिडीओ व्हायरल होतो आहे.

व्हायरल व्हिडीओ (Viral Video)

सोशल मीडियावर आतापर्यंत अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. ज्यामध्ये कधी तरुण मुलं, मुली तर कधी प्रेमी युगुल रस्त्यांवर वाहन चालवतेवेळी नियमाचे उल्लंघन करताना दिसले असतील. पण सध्या जो व्हिडीओ व्हायरल होतोय तो पाहून तुम्हाला आश्चर्यही वाटेल आणि संताप देखील येईल. कारण या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत दिसतंय, एक जोडपं स्कूटीवरून कुठेतरी जात आहे. दरम्यान त्यांनी केलेल्या कृत्यामुळे त्यांच्याच मुलाचा जीव धोक्यात आला. या व्हिडिओतील जोडप्याने मुलाला सीटवर बसवण्याऐवजी स्कुटीच्या फूटरेस्टवर उभे केले.

पुढे जाऊन या पालकांचा निष्काळजीपणा मुलांच्या अंगलट येता येता राहिला. स्कुटीच्या फुटरेस्टवर या जोडप्याच्या मुलग उभा असताना अचानक त्याचा तोल बिघडताना यात दिसतंय. (Viral Video) त्याच्या वजनाने फूटरेस्ट जर तुटले असते तर मोठा भीषण अपघात झाला असता. त्यामुळे मुलाच्या जीवावर आलेलं मोठं संकट इथे टळताना दिसलय. अशाप्रकारे, मागचा पुढचा विचार न या पालकांनी मुलाबाबत दाखवलेली बेफिकीरी खरोखरच संतापजनक आहे. दैव बलवत्तर होते म्हणून ठीक, अन्यथा होत्याचे नव्हते झाले असते.

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

सोशल मीडिया X हँडलवर Gulzar_sahab नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. सोबत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘कोणतेही पालक आपल्या मुलाशी असे कसे करू शकतात? अतिशय लाजिरवाणा व्हिडीओ’. या व्हिडिओवर अनेक नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. (Viral Video) एका नेटकऱ्याने लिहिलंय, ‘खरंच लोक वेडे होत चालले आहेत, रीलसाठी मुलाच्या जिवाचीही पर्वा केली नाही’. तर आणखी एकाने लिहिलं, ‘व्हिडीओ बनवणाऱ्या मूर्ख माणसाने व्हिडीओ बनवत राहण्यापेक्षा त्यांना थांबवायला हवे होते’. अन्य एकाने लिहिले, ‘निष्काळजीपणाची एक सीमा असते’.