Viral Video : सिगारेट दिली नाही म्हणून पेट्रोल पंपावरचं पेटवली कार; सनकी तरुणीचा व्हिडीओ व्हायरल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Viral Video) संपूर्ण जगभरात सनकी लोकांची काहीच कमी नाही. राग आला म्हणून हे केलं.. राग आला म्हणून ते केलं. अशी अनेक उदाहरण देता येतील. कारण प्रत्येक माणूस आपापल्या विचारात कधी काय करेल? याचा कुणीही अंदाज लावू शकत नाही. अशाच एका सनकी महिलेचा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होतो आहे. जिचा कारनामा पाहून तुम्हाला नेमकं काय बोलावं तेच सुचणार नाही. हा व्हिडीओ सोशल मीडिया X हँडलवर व्हायरल होतो आहे.

आपण पाहिले असेल की, पेट्रोल पंपाच्या भागात एक सूचना लिहिलेली असते. ती अशी की, या आवारात मोबाईलचा वापर करू नये आणि कोणताही ज्वलनशील पदार्थ आणू नये. (Viral Video) असे असूनही एका महिलेने पेट्रोल पंपावर चक्क सिगारेटची मागणी केली. तिने ज्या व्यक्तीकडे सिगारेट मागितली त्याने स्पष्टपणे नकार दिला. ज्यामुळे ही महिला संतापली आणि तिने रागाच्या भरात जे केलं ते पाहून तुमचा तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. या महिलेने संतापून तिला सिगारेटसाठी नकार देणाऱ्या माणसाची चक्क कार पेटवून दिली.

या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओत, पेट्रोल पंपावर एक महिला आणि एक व्यक्ती दिसते आहे. दोघांमध्ये काही संभाषण होत आहे. (Viral Video) मात्र नेमका त्यांचा काय संवाद सुरु आहे हे सांगता येणार नाही. एका वृत्तानुसार असे सांगितले जात आहे की, या व्हिडिओतील महिला त्या व्यक्तीकडे सिगारेट मागत होती. मात्र त्या व्यक्तीने महिलेस सिगारेट देण्यास नकार दिला. हा नकार त्या महिलेच्या इतका डोक्यात गेला की तिने कोणताही मागचा पुढचा विचार न करता थेट या माणसाच्या गाडीला आग लावली.

(Viral Video)अगदी काही क्षणात ही आग पूर्ण गाड़ीत पसरली आणि गाडी जळून खाक झाली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. या व्हिडिओवर अनेक नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. हा व्हायरल व्हिडीओ PicturesFoIder नावाच्या X हँडलवर शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत अनेक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून अनेकांनी महिलेच्या कृत्यावर संताप व्यक्त केला आहे. काही नेटकऱ्यांनी या महिलेला तिच्या कृत्यासाठी अटक करा आणि जेलमध्ये धाडा अशी मागणी केली आहे.