Viral Video : अरे वाह!! कावळा खेळतोय फुल्ली- गोळा; सोशल मीडियावर व्हिडीओ झाला व्हायरल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Viral Video) तुमच्या लहानपणी तुम्ही फुलली गोळा खेळले असाल. अजूनही कधी कधी कंटाळा आला आणि लहान मुलांबरोबर खेळायचं म्हटलं की हा खेळ सर्रास खेळला जातो. लहानपणीच्या या खेळाची मज्जाच काही और आहे. आजही अभ्यासाची वही असती तर त्यातली दहा- बारा पानं फुल्ली-गोळा खेळून भरली असती. असे हलके फुलके खेळ मेंटल स्ट्रेस कमी करायला मदत करतात. त्यात सोबत जर खास व्यक्ती खेळत असेल तर आणखीच मजा असते. दरम्यान हा खेळ खेळतानाचा एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये चक्क एक कावळा फुलली गोळा खेळताना दिसतोय.

व्हायरल व्हिडीओ (Viral Video)

या व्हायरल व्हिडिओत दिसणारा कावळा त्या व्यक्तीने पाळलेला आहे. त्यामुळे दोघांची चांगली गट्टी आहे. या व्हिडीओमध्ये सुरुवातीला एका कोपऱ्यातील चौकोनात लाल रंगाचा बदाम ठेवून कावळ्याने खेळाची सुरुवात केल्याचे दिसते. त्यानंतर ती व्यक्ती त्याची फुल्ली लाल बदामाखाली ठेवते. (Viral Video) असे दोन- तीन वेळा दोघे त्यांचे-त्यांचे डाव खेळतात आणि शेवटी कावळा आपला शेवटचा बदाम मधल्या रकान्यात ठेवतो आणि फुल्ली-गोळा जिंकतो. या खेळाचा विजेता झाल्याचा एक वेगळाच आनंद कावळ्याच्या कृतीत दिसून येतो.

… आणि चतुर कावळा जिंकला

फुल्ली गोळा जिंकल्यानंतर ‘आपण जिंकलो’ हे समजताच कावळा त्याची चोच उघडताना दिसतो. त्याने त्याच्या जिंकण्याचा आनंद त्याच्या पद्धतीने व्यक्त केला आहे. अर्थात, त्याच्या या हुशारीसाठी आणि विनिंग सेलिब्रेशनसाठी कावळ्याच्या मालकाने बक्षीस म्हणून काऊला खाऊ दिला आहे.

(Viral Video) सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. सोशल मीडिया इंस्टाग्रामवर voron_gosha_tv नावाच्या हँडलवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

या व्हिडिओवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. यावर एका नेटकऱ्याने कमेंट करताना लिहिलंय की, ‘अरे छान!! जिंकल्यावर किती खूश झालाय तो कावळा.. किती गोड दिसतोय’. तर आणखी एका नेटकऱ्याने लिहिले आहे की, ‘अरे वाह!! कावळ्याला पण हा खेळ चांगला जमतोय. किती हुशार आहे हा कावळा’. (Viral Video) तर आणखी एका युजरने म्हटलं की, ‘आता मलापण कावळा पाळायची इच्छा होतेय’.