Viral Video : मानवी वस्तीत घुसला चिडलेला रानगवा; व्यक्तीवर केला हल्ला.. हवेत फेकून 3 वेळा आपटले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Viral Video) सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ कायम व्हायरल होताना दिसतात. यातील बरेच व्हिडिओ प्राण्यांचे असतात. काही क्युट तर काही डेंजर टाईपचे हे व्हिडिओ कायम सोशल मीडियावर व्हायरल होतात. अनेकदा जंगली आणि हिंस्र प्राणी मानवी वस्तीत शिरल्याचे व्हिडिओ समोर येत असतात. अशातच सोशल मीडियावर आणखी एक अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल होतोय. या व्हिडिओत एक रानगवा मानवी वस्तीत शिरल्याचे दिसत आहे. इतकेच नव्हे तर या रानगव्याने एका व्यक्तीवर हल्ला देखील केल्याचे स्पष्ट दिसून आले आहे. हा व्हिडिओ आयएफएस अधिकारी परवीन कासवान यांनी ट्विटर हँडलच्या माध्यमातून शेअर केला आहे. पाहूया व्हिडीओ.

हा व्हिडिओ शेअर करतेवेळी आयपीएस अधिकारी परवीन कासवान यांनी म्हटलंय, ‘रानगव्याला हुसकावल्यामुळे त्याने या व्यक्तीवर हल्ला केला’. (Viral Video) हा व्हिडिओ पाहिला असता लक्षात येते की, अनेक इशारे देऊनही एक व्यक्ती रानगव्याला हुसकावते. परिणामी रानगवा संतापतो आणि त्याच्या अंगावर धावून जातो. त्या व्यक्तीला शिंगावर उचलून थेट हवेत भिरकावून लावतो. एका क्षणात तो व्यक्ती जमिनीवर कोसळतो आणि जखमी होतो. कासवान यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक जखमा झाल्या असल्या तरीही ती व्यक्ती सुरक्षित आहे.

IFS अधिकारी परवीन कासवान यांची पोस्ट

हा व्हिडिओ शेअर करताना कासवान यांनी कॅप्शन मध्ये लिहिले आहे की, ‘हिंदीत एक म्हण आहे – आ बैल मुझे मार. इशारा दिल्यानंतरही या व्यक्तीने रानगव्याला हुसकावले आणि त्यामुळे सर्वांचाच जीव धोक्यात आला. (Viral Video) रानगवा मानवी वस्तीत शिरला ही घटना आमची टीम पोहोचण्यापूर्वीच घडली. आमचे पथक पोहोचले आणि खूप अडथळ्यांनंतर या प्राण्याची सुटका केली. विनाकारण वन्यप्राण्यांना भडकावू नका. ते धोकादायक आहे. प्रत्येक वन्य प्राण्यांपासून एक सुरक्षित अंतर ठेवावे’.

पुढे म्हटलंय, ‘जेव्हा आपण या अंतराची सीमा ओलांडतो तेव्हा या प्राण्यांना धोका असल्याची जाणीव होते. परिणामी रानगव्यासारखे प्राणी गोंधळतात आणि त्यामूळे उधळल्यासारखे वागतात. अशावेळी वन्यप्राणी भीतीमुळे हिंस्र वागतात. यामध्ये सामान्य लोकांना दुखापत होऊ शकते. वरील प्रकरणात आमची टीम गर्दीच्या परिसरात कोणालाही मोठी इजा न होता बचाव कार्य करण्यास सक्षम होती’. (Viral Video)